इंदापूर तालुक्यातील एका हॉटेलबाहेर आढळला अर्धवट कापलेला पाय; मॉर्निंग वॉकला गेलेल्यांना दिसला अ


पुणे: गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीच्या (Pune Crime News) घटना घडत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलपासून ५०० ते ७०० मीटर अंतरावर एका पुरूषाच्या कापलेला डाव्या पायाचा अर्धा भाग (Pune Crime News)आढळून आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत कळंब नीमसाखर रोडवर ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी लोकांना अर्धा कापलेला पाय आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.(Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले. सध्या अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायाचा भाग एका पुरूषाचा आहे आणि तो डावा तुटलेला पाय आहे.  पाय रस्त्यावर पडलेला आढळला. पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि रस्त्यावर पडलेला तो पायाचा भाग कोणाचा आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pune Crime News: कोणाचा पाय? हे अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी सांगितले की बुधवारी सकाळी एका हॉटेलच्या बाहेर, थोड्या अंतरावर, अर्धा कापलेला पाय आढळला. पायात मोजे देखील घातले होते. पायाची ओळख अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरच माहिती समोर येईल. स्थानिकांनी सांगितले की, सकाळी लोक फिरायला बाहेर पडले होते तेव्हा त्यांना हॉटेलच्या बाहेर एक तुटलेला पाय दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. पायात मोजे घातले होते.

डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील हा भाग असून तो वाहतुकीच्या रस्त्यावर पडलेला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.

Solapur Crime News: सोलापुरातील तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (12 नोव्हेंबर) दुपारी घडली. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय 32, रा. समर्थ सोसायटी, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड) असे मृत वकिलाचे नाव आहे. या घटनेने सोलापूरमध्ये (Solapur Crime) मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर यांनी बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर घरच्यांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी त्यांना खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेव्हाच डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.