2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल


मुंबई : भारताचा ऑल राऊंडर क्रिकेटर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur ) आयपीएलचा पुढील हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबई इंडियन्सनं लखनौ सुपर जायंटस सोबत ट्रेड डील करत शार्दूल ठाकूरला संघात घेतलं आहे. आता शार्दूल ठाकूर रोहित शर्माच्या साथीनं मुंबई इंडियन्सच्या साथीनं खेळताना पाहायला मिळेल.  शार्दूल ठाकूर गेल्या वर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र, लखनौ सुपर जायंटसनं  मोहसीन खान जखमी झाल्यानं त्याच्या जागी संघात घेतलं होतं.

Shardul Thakur joins Mumbai Indians : शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात

मुंबई इंडियन्सनं लखनौ सुपर जायंटस सोबत ट्रेड कील करत संघात सामील करुन घेतलं. मुंबई इंडियन्सनं शार्दूल ठाकूरसाठी 2 कोटी रुपये मोजले आहेत. शार्दूल ठाकूरला गेल्या वर्षी लखनौनं 2 कोटी रुपयांमध्ये संघात सहभागी करुन घेतलं होतं. तितकीच रक्कम यावर्षी मुंबई इंडियन्सकडून त्याला दिली जाणार आहे.

लखनौ सुपर जायंटस सध्या विदेशी वेगवान गोलंदाज ऑलराऊंडरच्या शोधात आहेत. त्यापूर्वी लखनौकडे शिल्लक रक्कम अधिक असावी यासाठी त्यांनी शार्दूल ठाकूरला रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

शार्दूल ठाकूरनं आयपीएलमध्ये 2015 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटस या संघात दाखल झाला. 2018 ते 2021 मध्ये शार्दूल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. दिल्ली कॅपिटल्सकडून शार्दूलनं 2022 च्या हंगामात सहभाग घेतला. तर,2023 मध्ये शार्दूल ठाकूरला 10.75 कोटी रुपयांमध्ये  कोलकाता नाईट रायडर्सनं संघात घेतलं होतं. शार्दूल ठाकूर 2024 मध्ये पुन्हा चेन्नईच्या संघात दाखल झाला. त्यानंतर शार्दूल ठाकूर 2025 मध्ये लखनौकडून खेळला आता तो पहिल्यांदा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. शार्दूल ठाकूरनं आयपीएलमध्ये 105 मॅचेसमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत.

भारताचा माजी फिरकीपटू आर. अश्विन यानं एक दिवस अगोदर  त्याच्या यूट्यूब चॅनेलवरुन शार्दूल ठाकूर मुबंई इंडियन्सच्या संघात दाखल असा दावा केला होता. मात्र, नंतर त्यानं व्हिडिओ डीलीट केला.  विशेष म्हणजेच  मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर आर. अश्विनच्या व्हिडीओची लिंक पोस्ट केली, ज्यात त्यानं शार्दूल ठाकूर मुंबईच्या संघात जाणार असल्याची घोषणा केली होती.

मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरबाबत लखनौ सुपर जायंटससोबत ट्रेड डील करु शकते. लखनौ सुपर जायंटसला विदेशी ऑलराऊंडरसोबत एक बॅकअप पर्याय आवश्यक आहे. अर्जुन तेंडूलकरची फी सध्या 30 लाख रुपये आहे. ज्याचा लखनौच्या पर्सवर परिणाम होणार नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.