एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी महत्त्वाची बैठक, निवडणुकीसाठी रणनीती ठरली


मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करम्यात आली.   एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणायची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर दिली आहे. जो विश्वास ठेवत नगरसेवकांनी शिंदेंची साथ धरली त्यांना जागा मिळवून देणं आणि जिंकवून देण्याची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर देण्यात आली आहे.

मराठी : अडीच वर्षातील कामांच्या बळावर निवडणूक लढा : एकनाथ शिंदे

मुंबईकरांचे स्वप्नातील घर हे त्यांना मुंबईतच मिळावे यासाठी काम करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.  मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई मध्ये राहणाऱ्या लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणं हाच मुंबईसाठी निवडणुकीचा शिवसेनेचा अजेंडा ठरला आहे. कोणाशी युती होईल नाही होईल हे वरिष्ठ नेते ठरवतील ,तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर काम करा, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

आपण गेली अडीच तीन वर्षांत जी कामं केलीत त्याच बळावर निवडणुकीला समोरे जाण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.  आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवा आणि उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करा असंही शिंदे यांनी सांगितलं.  आपल्या कामाची पोहोच पावती घरोघरी पोहचवण्याचे आदेश शिंदेंनी दिले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झाले?

उद्धव ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांची युतीत जागा मिळवणं आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी आमदार खासदारांवर सोपवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली.

मुंबईकरांच्या कामांना महत्व द्या. रखडलेली काम त्वरीत मार्गी लावा. एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले आदेश. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट, कोस्टल रोड, मेट्रोसारख्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गृहनिर्माण विभागातर्फे राबवले गेलेले प्रकल्प लोकांपुढे ठेवा. क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची माहिती लोकांना द्या. मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट, कोस्टल रोड, मेट्रोसारख्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीमुळं तीन पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार हे ठरलेलं नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.