10 मिनीटात पोहोचतो, शेवटचा फोन अन् नवले ब्रिज परिसरात काळाचा घाला; नवसाचा तो शेवटचा गुरुवार ठरल


पुणे: पुण्यातील मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या या अपघातात (Pune Navale Bridge Accident) नवलकर कुटुंबासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नियतीने असा क्रूर घाला घातला की, कुटुंबातील स्वाती संतोष नवलकर (३७) ज्या नवसपूर्तीसाठी देवदर्शनाला गेल्या होत्या, तो नवसाचा पाचव्या आणि शेवटचा गुरुवारच त्यांच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला. मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य अन् आजारी वडील दत्तात्रय दाभाडे यांना बरं वाटावं, यासाठी स्वाती नवलकर नारायणपूर दत्तमंदिरात परिवारासह गेल्या होत्या. वडिलांना दीर्घ आजारातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी ५ गुरुवारचा नवस केला होता. परतताना अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर, नवले पुलाजवळ आल्यानंतर काळाने घात (Pune Navale Bridge Accident) केला आणि परिसवाराचा जागीच दुर्दैवी अंत झाला.(Pune Navale Bridge Accident)

Pune Navale Bridge Accident : मला काही नकोय, माझी आई पाहिजे, मुलीची आर्त हाक

अपघातानंतरचा सर्वांत हृदयद्रावक क्षण म्हणजे, स्वाती नवलकर यांच्यासोबत असलेली त्यांच्या मैत्रिणीची मुलगी मोक्षिता रेड्डी (३) हिचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढताना स्वाती यांनी त्या लहान मुलीला कवेत घेतलेले होते. स्वाती यांच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला मातृछत्र हरपल्याचे कळाल्याची बातमी कळताच, तिने ‘मला काही नाही पाहिजे, मला माझी आई पाहिजे असा फोडलेला आर्त टाहो संपूर्ण परिसर हेलावून टाकणारा होता. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Pune Navale Bridge Accident : दहा मिनिटांत पोहोचतो आहोत, असा शेवटचा फोन

दुसरीकडे, स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा होता. केक आणि वाढदिवस त्याच दिवशी पावभाजीची तयारी करा, आम्ही दहा मिनिटांत पोहोचतो आहोत, असा शेवटचा फोन स्वाती यांनी कुटुंबीयांना केला होता; मात्र आनंदाचा दिवस एका भीषण शोकात बदलल्याने नवलकर कुटुंबिय व परिसरात शोककळा पसरली. स्वाती यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि अविवाहित बहीण असा परिवार आहे. या वेदनादायी घटनेने संपूर्ण वडगाव खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर कारचालक धनंजय कोळी यांना नुकतेच बाळ झाले होते. ते तीन महिन्याचे आहे, या कुटुंबाला घरी सोडल्यानंतर ते आपली पत्नी व बाळाला भेटायला जाणार होते; पण एका क्षणात त्यांच्या कुटुंबाचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले.

आणखी वाचा

Comments are closed.