संतापजनक! सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून सर्वांसमोर मारहाण, घटनेचा व्हिडीओ व्हायर


सोलापूर: सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी जवळील एका हॉटेल मालकाने मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना (Solapur Crime News) समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे (Solapur Crime News) त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. टेंभुर्णी येथील हॉटेल 77 77 या हॉटेलचा मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण (Solapur Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे, या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर येत असून राजरोसपणे नग्न करून मारहाण करणारा हॉटेल मालक अजूनही मोकाट आहे.(Solapur Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.