अखेर हॉटेल 7777 वाल्या लखन मानेला अटक; मॅनेजरला नग्न करन मारहाण करणे अंलगट, काय म्हणाले पोलीस?
सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या घृणास्पद प्रकारामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे समोर आले आहेत. मात्र एबीपी माझाच्या दणक्यानंतर अखेर मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. टेंभुर्णी येथील एका हॉटेलमध्ये येथील मॅनेजरला नग्न करून मालकाने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील हॉटेल 7777 इथं घडला होता प्रकार
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथील हॉटेल 7777 येथे हा प्रकार घडल्याचे उघड झाले. या हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या मॅनेजरलाच हॉटेलचा मालक लखन माने याने सर्व कामगारांदेखत नग्न करून पाईपने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर हॉटेल मालक लखन माने याने फेसबुक वरून या मॅनेजरला सोबत घेत याचा खुलासाही केला होता. मॅनेजरच्या चुकीमुळे त्याला मारहाण केल्याचे सांगत चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले होते. मात्र आज पोलिसांनी या प्रकरणी मारहाण झालेला फिर्यादी निवासी नकाते याच्याकडून फिर्याद घेत वस्तुस्थिती समोर आणली. त्यानुसार हॉटेल मालक लखन माने यांनी मॅनेजरला काम सोडून जाऊ नये म्हणून दमबाजी करत लग्न करून मारहाण तर केली शिवाय त्याच्या खिशातले पैसे हे काढून घेतल्याचे टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीने हॉटेलवरुन आरोपी लखन माने यास ताब्यात घेतले
दरम्यान, ही घटना तीन महिन्यापूर्वीची असल्याचे मारहाण झालेला निवासी नखाते यांनी पोलिसांना सांगितले आहे. लखन माने यांच्या दहशतीमुळं अजूनही तो त्याच हॉटेलवर काम करत असून पोलिसांना तसा जबाबही दिल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. माझाच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीने हॉटेलवरुन आरोपी लखन माने यास ताब्यात घेत तब्बल आठ वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या मध्ये दहशत माजवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान लखन माने या आरोपीने कामगारांवर दहशत बसवण्यासाठी केलेल्या या अमानवी मारहाणीच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा दावा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
नवरा सोडला, बॉयफ्रेंडसोबत गेली, अनैतिक संबंधाला विरोध करताच जन्मदात्याला संपवलं, भावालाही जबर मारहाण, मुंबई हादरली
आणखी वाचा
Comments are closed.