शरद पवारांनी कार्यकर्त्यांना बंधन घातले तर, आहे ते पळून जातील आणि पक्षच डुबेल, दानवेंचा टोला
शरद पवारांवर रावसाहेब दानवे : शरद पवारांनी (Sharad Pawar) आता जर कार्यकर्त्यांना बंधन घातले तर आहे ते कार्यकर्तेही पळून जातील आणि पक्षच डुबेल असं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve ) यांनी केलं आहे. शेवटी कार्यकर्ते पण टिकले पाहिजे, असंही ते म्हणाले. बिहारच्या निवडणुकीमुळे या देशातल्या निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, हे सिद्ध करुन दिलं आहे. त्यामुळं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमताने एनडीए येईल असे मत दानवे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी चार सोलापूरचे आणि संपूर्ण राज्यात सहा जण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती आणि आघाड्यांसाठी मोकळीक देणाऱ्या शरद पवारांना भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टोला लगावला. राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यापैकी चार सोलापूरचे आणि संपूर्ण राज्यात सहा जण आहेत. त्यामुळं कार्यकर्ते टिकवण्यासाठी परवानगी दिली असून त्यांना बंधन घातले तर आहे तो पक्ष डुबून जाईल असा खोचक टोला देखील रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. बिहार निवडणुकीमुळे देशाचं वार कोणत्या दिशेने वाहत आहे हे स्पष्ट झाले असून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एनडीए बहुमतात येऊन विरोधी पक्षाचा सुपडा साफ होईल असं भाकित देखील रावसाहेब दानवे यांनी वर्तवले आहे.
Sharad Pawar on Devendra Fadnavis: नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बिहार निवडणुकीच्या निकालावर शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीचे मतदान झाले. त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत मतदान महिलांनी हातामध्ये घेतले होते. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला, याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा. महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले, प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्या वतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले म्हणजेच लाडकी बहीण योजना. यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगाने देखील याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
Bihar Election Result 2025: पवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटले, फडणवीस म्हणतात, चांगल्या योजना आणायला तुम्हाला कोणी रोखलं, जो जीता वही सिकंदर!
आणखी वाचा
Comments are closed.