सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात…


मुंबई : भारतीय शेअर बाजारात सोमवारी सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली आहे. भारतात सध्या 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. त्यापैकी छोट्या बँकांचं मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण येत्या काळात केलं जाणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालय आगामी काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाची रणनीती तयार करण्यावर काम करत आहे. याची  अधिकृत घोषणा पुढील वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. ही विलिनीकरणारची प्रक्रिया 2 ते 3 फेऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील बातमी समोर येताच बँकांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

PSU Bank Merger : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं विलिनीकरण

भारतात सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 12 आहे. केंद्र सरकार बँकांचं विलिनीकरण करुन केवळ 6-7 मोठ्या बँका बनवण्याच्या तयारीत आहे त्यामुळं पहिल्यांदा 1-2 छोट्या बँकांचं विलिनीकरण केलं जाऊ शकतं किंवा त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पंजाब नॅशनल बँक या सारख्या मोठ्या बँकांमध्ये विलीन केलं जाऊ शकतं. काही बँकांना थेट मोठ्या बँकेत विलीन केल जाऊ शकतं.

गेल्या तीन वर्षांमध्ये सार्वजनिक बँका मोठ्या नफ्यामध्ये आहेत. या बँकांना निधीसाठी सरकारवर अवलंबून राहावं लागत नाही. यापूर्वी 2017 ते 2022 मध्ये सार्वजनिक बँकांना सरकारनं 3 लाख कोटी रुपये दिले होते.

केंद्र सरकारनं यापूर्वी देखील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं विलिनीकरण केलेलं आहे. 2020 मध्ये 10 पीएसयू बँकांचं विलिनीकरण करुन त्यांची संख्या 12 वर आणली होती. त्यापूर्वी 2017 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांचं आणि भारतीय महिला बँकेचं एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आलं होतं.

रिपोर्टनुसार छोट्या राष्ट्रियीकृत बँकांचं मोठ्या राष्ट्रियीकृत बँकांमध्ये विलिनीकरण केलं जाऊ शकतं. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्रयूको बँक, पंजाब अँड सिंध बँक यांचा समावेश आहे.

सोमवारी निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढला होता. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यूको बँक, पंजाब अँड सिंध बँक या सारखे शेअर टॉप गेनर्स आहेत. अंशूल जैन यांच्या मतानुसार पीएसयू बँक निर्देशांक 8500 च्या पार गेला आहे. तो आता 9000 पर्यंत वाढू शकतो. सेंट्रल बँक, यूनियन बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.