राज ठाकरेंची बाळासाहेबांसाठी भावनिक पोस्ट; भाजप अन् शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या,काय म्हणाले?


राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (17 नोव्हेंबर) 13 वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) अभिवादन केलं. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. साधारण 11 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर एकत्र पाहायला मिळाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.

भाजपचा कमांडल वाद फोकवायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागवणारे बाळासाहेबचं होते. बाळासाहेबांसाठी हिंदुत्वाचा विषय अस्मितेचा होता, व्होट बँकेचा नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटला एकप्रकारे कानपिचक्याच दिल्या आहेत. बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिळवणाऱ्यांची किंवा त्यावर मते मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत. ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराची झालेली मशागत किती समृद्ध होती, याची पुसटशी देखील कल्पना नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं. (Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray)

राज ठाकरे पोस्टद्वारे नेमकं काय म्हणाले? (Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray)

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच, असं राज ठाकरे म्हणाले. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर- (Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial)

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसले. गेल्या अनेक महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काहीवेळ चर्चाही झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचंही दिसून आले.

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: ठिकाण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक; दादरच्या शिवाजीपार्कमध्ये काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.