राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार,
नाशिक नगर परिषद निवडणूक 2025: मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातल्या 246 नगरपरिषदा (Nagarparishad) आणि 42 नगरपंचायत (Nagarpanchayat) निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छूक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. काल रविवार सुट्टीचा दिवस असताना सुध्दा मोठ्याप्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले. त्यातच आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शनं करत उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कोणकोण अर्ज भरणार आणि त्यानंतर अर्ज माघारीसाठी कोण तडजोड करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्याच दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतून (Nashik Nagarparishad Election 2025) मनसेने माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकही अधिकृत उमेदवार उभा राहणार नाही. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक न लढण्याच्या सूचना दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नाशिक नगरपरिषदेची निवडणूक देखील एकत्र लढणार असल्याची चर्चा रंगली असताना आज राज ठाकरे यांनी अचानक नाशिक नगरपरिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेताला आहे.
नाशिकमध्ये काय घडलं होतं? (Nashik Nagarparishad Election 2025)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसह महाविकास आघाडीने एकत्र येत चर्चा केली होती. तसेच नाशिकमध्ये मनसेसह महाविकास आघाडीने पत्रकार परिषद देखील घेतली होती. याच पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसमध्ये वादळ निर्माण झालं होतं. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी मनसेसोबत जाण्याची भूमिका मांडल्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनसेसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला होता.
मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्यास काँग्रेसचा होता विरोध- (Congress On MNS 2025)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Body Election) रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने (Congress) मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.