अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल, आई शर्मिला ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; पुण्यातील जमीन घोटाळाच काढला
मुंबई : मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धुळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आपल्या भावाच्या समर्थनार्थ पुढे आले. शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. तसेच, ही दादागिरी मोडून काढू असेही त्यांनी म्हटले. आता, लेकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आई शर्मिला ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतिम सुनावणीला होत असलेल्या विरोधावरुन टीका केली.
शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते आज प्रभादेवी येथे नव्याने सुरु झालेल्या एका कॅफेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. मराठी माणूस, बिहार निवडणूक, अमित ठाकरेंवरील गुन्हा, गडकिल्ले यांवर भाष्य केले. बिहारमधील निवडणुकांच्या निकालावर बोलताना, हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे. संकटात कोण उपयोगी असते हे पाहून मतदान केले पाहिजे. बिहारमध्ये मोठ्या संख्येने मतदान झाले आहे, पण आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून मतदान केले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं.
1800 कोटींचा घोटाळा, पण गुन्हा नाही
अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात बोलताना, मला अभिमान आहे, मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते, अशी परखड प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहेत. पण, आम्ही होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल, असे म्हणत लेकावरील दाखल गुन्ह्यासंदर्भात भूमिका मांडली. तसेच, 1800 कोटींचा जामीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं.
सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही
मला सुप्रीम कोर्टालाही प्रश्न विचारायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षांपासून सुरू आहे. सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की, त्यांना वेळच देत नाही. कोणाला बोलायचं हाच प्रश्न आहे.पक्षच बळावून घेतले जात आहेत. आता जानेवारीमध्ये निकाल देणार आहेत, तोपर्यंत निवडणुका होऊन जातात. तुम्हाला निवडून येणार अशी खात्री आहे, तर मग तुम्ही मैदानात या आणि निवडणूक लढा, असे आव्हानही शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला दिले.
बिहारमध्ये अन् मुंबईतही मतदान करणार
खोट बोला पण रेटून बोला असं काम सध्या सुरू आहे. बिहारमध्ये आकडेवारीनुसार 3.50 कोटी मतदार होते, आणि 7 कोटी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय आणि मग तुमच्याकडं कोण पाहणार? निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार? अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरुन नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.