आधी अनगरमध्ये बिनविरोध 17, आता जळगावमध्येही कमळ खुललं; 3 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. भुसावळ मध्ये भाजपच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तर सावदामध्ये रंजना भारंबे आणि जामनेर मध्ये उज्वला तायडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी भाजपकडून जोरदार जल्लो
सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी भाजपकडून जोरदार जल्लोष पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सावदा, भुसावळ, आणि जामनेर या ठिकाणी भाजपची ताकद आहे. त्यामुळं या भागात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही ठिकाणचे तीन नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. या आयाधी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपचे 17 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
अनगर नगरपंचायतीमध्ये 17 नगरसेवक बिवनिरोध
काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्राचे लक्ष वेधले. कारण, मोहोळ (solapur) तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी असले तरी माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपत प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या अनगर गावातली ही निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हालचालीसा सुरुवात केली आहे. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी अर्ज भरण्याची मुदत देखील संपली आहे. त्यामुळं काही ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनगर नगरपंचायीतमध्ये भाजपचे 17 उमेदवार बिनविरोध निवडूबन आले आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेह. हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, येत्या 2 डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आधी अनगरमध्ये बिनविरोध 17, आता जळगावमध्येही कमळ खुललं; 3 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकले
आणखी वाचा
Comments are closed.