ठाकरे गटाला मोठा धक्का! अद्वय हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरणं बदलणार


अद्वय हिरे आणि राजू शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग, आऊट गोईंग सुरु आहे. सत्ताधारी भाजपमध्ये येणाऱ्यांच प्रमाण जास्त आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. राजू शिंदे (Raju Shinde) यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे (Advay Hire) हे देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदें गटाचे कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय.

राजू शिंदे यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात लढवली होती. तर अद्वय हिरे यांनी  आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर ठाकरे गटाच्या अने पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश केला आहे. राजू शिंदे यांच्या प्रवेशामुळं भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये 2029 ची तयारी सुरु केलीय का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे एक हाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही : राजू शिंदे

मी घरवापसी करतोय, त्यासाठी आभार आपले मानतो असे मत राजू शिंदे यांनी व्यक्त केले. मध्यंतरी तांत्रिक अडचण होती म्हणून तिकडे गेलो होतो. आता आपल्याच जीवावर जे मोठे झाले होते त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो अशी टीका नाव न घेता राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांचे नाव न घेता केली. भाजपवर नाराज कधीच नव्हतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे एक हाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही. अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करु. शतप्रतिशत भाजप केल्याशिवाय जिल्हा राहणार नाही. भाजप कधी मी सोडणार नाही असे मत राजू शिंदे यांनी व्यक्त केले. आमचा देव तोच होता, आता पण बदलणार नाही. समाधान होईल तेव्हा जबाबदारी द्या, तोपर्यंत देऊ नका असं मी अतुल सावेंना सांगितल्याचे राजू शिंदे म्हणाले.

मालेगाव आणि नांदगावात महापौर भाजपचा बसेल : अद्वय हिरे

मला संधी दिली याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानतो. मालेगावात शतप्रतिशत भाजपसाठी आम्ही तयार आहोत असे मत अद्वय हिरे यांनी व्यक्त केले. मालेगाव आणि नांदगावात महापौर भाजपचा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अधिक जागा आपल्या पंचायत समितीत आणू. बाहेर कॅबिनेट मध्ये विरोधी पक्ष बहिष्कार घालण्यापर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं, पण याचा आनंद आहे. अद्वैय हिरेंकडून कॅबिनेटचा उल्लेख करताना दादा भुसेंना टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे कन्नड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये वापसी केली आहे. भरत राजपूत यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. मागील साडे तीन वर्ष माझी शिंदेंच्या शिवसेनेत कोंडी केली गेली. त्यावेळी, मला भाजपनं पाठबळ देण्याचा प्रयत्न केला.

Advay Hiray : कोण आहेत अद्वय हिरे?

नाशिक-मालेगाव परिसरात हिरे घराण्याचा प्रभाव प्रचंड आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत हिरे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव नवख्या दादा भुसे यांनी करून राजकारणातील समीकरणेच बदलून टाकली. त्यानंतर 2009 आणि पुढील काळात भुसे यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचा भगवा कायम टिकवला. हिरेंना 2014 नंतर भाजपमधील कामकाज आणि मोदींच्या नेतृत्वाची ओढ निर्माण झाली. याच काळात अद्वय आणि अपूर्व हिरे दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात केली. अद्वय हिरे यांनी 27 जानेवारी 2023 रोजी शिवबंधन हातात बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी मालेगावच्या राजकारणात आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली होती. महाविकास आघाडी सत्तेत असताना अद्वय हिरे यांनी शिवसेना मंत्र्यांविरोधात उघड भूमिका घेतली होती. नंतर शिंदे–भाजप सरकार आल्यानंतर त्यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. अद्वय हिरे यांनी शिंदे गटाच्या दादा भुसे यांना 2024 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत कडवे आव्हान दिले होते. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. आता अद्वय हिरे हे पुन्हा एकदा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा एकदा भुसे विरुद्ध हिरे हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजू शिंदेंनी संजय शिरसाटांच्या विरोधात लढवली होती निवडणूक?

2024 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शिंदेंनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. संभाजीनगर पश्चिममधून त्यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली होती. जवळपास 1 लाखांहून अधिक मतं त्यांनी घेतली होती. राजू शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, राजू शिंदे यांना शिवसेनेकडून देखील गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, त्यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Advay Hiray: अद्वय हिरेंचा भाजप प्रवेश शिंदे गट थांबवणार का? उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या घरी जाऊन बसले, नाशिकच्या राजकारणात ट्विस्ट

आणखी वाचा

Comments are closed.