उज्वला थिटे खऱ्या मर्दानी, कितीही मोठा बाहुबली असला तरी…; अनगरमधून उमेश पाटील कडाडले, काय काय


Angar Nagarpanchayat Election 2025: सध्या महाराष्ट्रात सोलापुरातील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची (Angar Nagarpanchayat Election 2025) चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. उज्ज्वला थिटे या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवला आहे. दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्वला थिटेंनी सांगितलंय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि  जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनगरकर पाटलांचा हा पळपुटे पणा पुन्हा सिद्ध झाला. लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन पाठिंबा सिद्ध करण्याची संधी गमावली. उज्वला थिटे यांच्यावर मोठा अन्याय झाला. किती ही मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते, हे सिद्ध झालं, अशी टीका उमेश पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना केली. अर्ज छाननीत बाद करून तुम्हीच जिंकला असला तरी लोक मतात उज्वला थिटे जिंकल्या. उज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत, तर अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत, असा निशाणा उमेश पाटील (Umesh Patil)  यांनी केला.  दरम्यान, अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज प्रस्तावक यांच्या स्वाक्षरीच्या अभावामुळे तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. उज्ज्वला थिटे यांनी हा राजकीय कट असल्याचा आरोप केला असून, त्यांचा मुलगा सोबत असताना सही कशी राहिली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

उज्ज्वला थिटे भाऊ मुनल्या? (उज्ज्वला ही ऑनलाइन)

राजन पाटील यांचा कट पाहा. पूर्वीपासूनच सर्वांना कल्पना होती, यांच्या विरोधात एखादा व्यक्ती गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात उभा राहू नये असे त्यांचे प्रयत्न असतात, त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घर जाळणे हे सर्व सगळ्यांना माहिती आहे, मी भविष्यात त्यांच्यासोबत लढणार म्हणून मी माझी मतदार यादीतून नाव काढण्याचा पहिलाच प्रयत्न चालू केला आणि आता स्वतः ते म्हणतात, 302 ची कलम आम्ही भोगणारे आणि माझ्या मुलाला मी 302 च्या कलमातून बाहेर काढला आहे, मी ज्यावेळी मुलाला घेऊन माफी मागायला गेले, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302 कलमातून मुलाला सोडवला आहे, माझ्यासमोर हा असला हट्टीपणा चालणार नाही, जेव्हा तुम्ही अशा मोठ्या गुन्ह्यातून मुलाला सोडवता, मग अशा माझ्या अर्जातून चार कागद बाद करायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार आहे, असंही उज्वला थिटे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं? (Solapur Angar nagarpanchayat news)

अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. काल अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर भाजपचे सर्व 17 उमेदवार बिनविरोध झाल्याचंही सचिन मुळीक म्हणाले. दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्वला थिटेंनी सांगितलं आहे.

संबंधित बातमी:

Ujjwala Thite Angar : उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठी चाल, अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा

आणखी वाचा

Comments are closed.