फडणवीसांकडून गुंडागर्दी, दमदाटीमुळेच मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध; यशोमती ठाकूरांनी सांगित
आल्हाद कलोती वर यशोमती ठाकूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत (Local Body Election) बिनविरोध निवडींचा पॅटर्न वाढत असताना, चिखलदरा नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती (Alhad Kaloti) बिनविरोध विजयी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या निवडीवरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजप (BJP), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चिखलदरा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 (ब) मधून नगरसेवक पदासाठी आल्हाद कलोती उमेदवार होते. त्यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराने माघार घेतल्याने ते बिनविरोध विजयी झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रवि राणा यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचेही समोर आले असून, विजयानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून “भाऊ, बिनविरोध झालं,” अशी माहिती दिल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. राज्यात यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत 17 नगरसेवक आणि नंतर नगराध्यक्ष बिनविरोध निवडले गेले. दोंडाई नगरपरिषदेतील बिनविरोध निवडही चर्चेत राहिली. याच मालिकेत आता चिखलदरा नगरपालिका समाविष्ट झाली आहे.
Yashomati Thakur on Devendra Fadnavis: यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधली आहे. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहे. मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करत आहेत. उमेदवारांना धमक्या दिल्या, पैसे दिले. त्यांचा डोळा तिथल्या जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. ज्या हिशोबाने ते संविधानाची तोडफोड करत आहेत ते योग्य नाही. भाजपमध्ये ओरिजनल कमी आणि भाड्याचे लोक जास्त आहेत. कलोती यांचा पराभव झाला असता तर नाचक्की झाली असती म्हणून त्यांनी दमदाटी केली, असा आरोप यशोमती ठाकरे यांनी केलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.