सुनील तटकरेंची वाटचाल कमळाच्या दिशेने; लवकरच ते भाजपमध्ये जाणार हे त्रिवार सत्य; शिंदेंच्या शिव
सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र दळवी: रोहा येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जोरदार टीका केली. “राष्ट्रवादीला लोक कंटाळले आहेत. रोह्याचे नाव सुनील तटकरे यांनी बदनाम केलं असून त्यांची महाराष्ट्रात घोटाळेबाज म्हणून ओळख निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलाय. तर राष्ट्रवादीला लोक कंटाळली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिंचन घोटाळ्यांपासून आतापर्यंत घोटाळेच घोटाळे केले, असा आरोप देखील दळवी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता केलाय. यामुळे पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
Mahendra Dalvi on Sunil Tatkare: मी तटकरेंवर जे काही आरोप केलेत ते त्रिवार सत्य
महेंद्र दळवी म्हणाले की, सुनील तटकरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात सर्वांना धक्का मारत आपली राजकीय कारकीर्द उभी केलीय. धक्का मारणे ही त्यांची संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही मात्र मनाचे शेठ आहोत, असे म्हणत दळवी यांनी मंत्री गोगावले यांची स्तुती केली आहे. मी तटकरेंवर जे काही आरोप केलेत ते त्रिवार सत्य असून तटकरेंनी राजकारणात आयुष्यभर चिटिंगच केली आहे. त्यांनी ज्यांच्या हाताखाली काम केलं त्यालाच त्यांनी फसवले आहे. मात्र त्यांची ही संस्कृती आता बंद केली पाहिजे, असे म्हणत महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
Mahendra Dalvi on Aditi Tatkare and Aniket Tatkare: काहीजण सोन्याचे चमचे घेऊन आलेत
आपल्या रोहा तालुक्याचे नाव बदनाम होण्याआधीच या लोकांना हद्दपार करणे काळाची गरज असल्याचे म्हणत महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्या टीकास्त्र सोडले. तसेच, तटकरे कुटुंबाचे फोन रात्री 9 वाजताच बंद होतात. त्यांना कोणाचीच पर्वा नसते. त्यांच्यात आता काहीजण सोन्याचे चमचे घेऊन आलेत, असा टोला त्यांनी मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर लगावलाय. आता महेंद्र दळवी यांच्या घणाघाती टीकेवर तटकरे कुटुंबीय काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर सुनील तटकरे हे आता कमळाच्या दिशेने जात असून त्यांची इकडची बॅग भरली की ते दिल्ली गाठतात. परंतु, सुनील तटकरे आता कमळाच्या दिशेने असून लवकरच ते भाजपमध्ये जातील हे त्रिवार सत्य असल्याचं म्हणत आमदार दळवींनी सुनील तटकरे यांच्याबाबत मोठा दावा केला.
Sunil Tatkare on Mahendra Dalvi: दळवींनी केलेली वक्तव्ये निंदनीय : सुनील तटकरे
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका केली आहे. अलीकडेच सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना महेंद्र दळवी यांना प्रत्युत्तर दिले होते. सुनील तटकरे म्हणाले होते की, दळवींनी केलेली वक्तव्ये ही निंदनीय आहेत. माझ्यावर टीका करणारी माणसे ही न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेली असून आम्ही भाजप आणि राष्ट्रवादी नेटाने काम करू, असे म्हणत त्यांनी महेंद्र दळवी यांना प्रत्युत्तर दिले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.