अंबरनाथ फ्लायओव्हरवर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू; शिवसेना शिंदे गटाची महिला उमेदवार गंभीर जखमी
अंबरनाथ कार अपघात: अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची (अपघात) संपूर्ण कार्यक्रम सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातात सहभागी असलेल्या कारमध्ये शिवसेना (शिवसेना) शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. किरण चौबे या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत (अंबरनाथ नगरपालिका निवडणूक) बुवापाडा प्रभागातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. प्रचार संपवून घरी जात असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
अंबरनाथ अपघात: नगरपरिषद निवडणूक लढवणारी शिंदे गटाची महिला उमेदवार गंभीर जखमी
दरम्यान, ही दुर्घटना घडली तेव्हा कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकीस्वारांना कारने जोरदार धडक दिली. या धडकेत अंबरनाथ पालिकेचे दोन कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे, तसेच कारचालक लक्ष्मण शिंदे आणि एक पादचारी सुमित चेलानी या व्यक्तीचा मृत्यू झाला. तीन जण जखमी असून किरण चौबे देखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत आहेत. सोबतच नक्की अपघाताची कारण काय? याचा देवगील आता तपास सुरू आहे.
Mumbai Crime : मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरण; चार आरोपींना अटक
मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार प्रकरणी चार आरोपींना मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी या आरोपींच्या टोळीने दुपारी पावणेदोनच्या सुमारास एका व्यवसायिकावर तीन गोळ्या झाडून आरोपी फरार झाले होते. यानंतर परिसरात असलेला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी ओळख पटवून फरार आरोपीला पुणेमधून अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखाया टीमने या आरोपीला पुणे परिसरांमधून फिल्मी स्टाईलमध्ये पकडघ्या आहे.
Palghar Leopard : 11 वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला , पाठीवरील दप्तरामुळे वाचला जीव
विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याचा भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे.
विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय पीडित विद्यार्थी मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता ५वी) हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता. शाळेतून घर 4 किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगलरस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दफ्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या. अचानक झालेल्या हल्ल्यानंतरही मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला, तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली. त्यानंतर जवळील नागरिक घटना स्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.