सोन्याच्या दरात पुन्हा पंधराशे रुपयांची वाढ, तुमच्या शहरात आजचा भाव किती? जाणून घ्या
आज सोन्याचा भाव: जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे दर मागील पंधरा दिवसांपासून स्थिर होते, पण गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा वाढ झाली असून, जीएसटीसह 1,27,000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदराबाबतच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या बाजारात दिसून येत आहे, ज्यामुळे विशेषज्ञांचा अंदाज आहे की पुढील महिन्यात अमेरिकेच्या व्याजदराच्या निर्णयानुसार भारतातही सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळू शकते.
Gold Price Today: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सोन्याचे दर काय?
मुंबई, पुणेनागपूर आणि नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,24,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर जळगावमध्ये जीएसटीसह 1,27,000 रुपये इतका भाव आहे. चांदीच्या दरांमध्येही बदल दिसत असून, 1 किलो चांदी 154,770 रुपये आणि 10 ग्रॅम चांदी 1,548 रुपये एवढा विक्रीला उपलब्ध आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार थोड्या फरकाने बदलत असतात.
Gold Price Today: 24 कॅरेट आणि 22 कॅरेट फरक काय?
सोन्याची खरेदी करताना 24 कॅरेट आणि 22 कॅरेट यातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे. 24 कॅरेट सोनं 99.9% शुद्ध असते, तर 22 कॅरेटमध्ये अंदाजे 91% शुद्ध सोने असते आणि उर्वरित 9% मध्ये तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातू मिसळून दागिने बनवले जातात. 24 कॅरेट सोनं जरी शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवणे कठीण असते, त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये दागिने विकतात. सोन्याच्या दरात सातत्याने बदल होत असल्याने ग्राहकांना खरेदीच्या वेळी शुद्धतेची खात्री घेणे आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Gold Price Today: सोन्याचे दर का वाढतात?
दरम्यान, 2025 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जोरदार परतावा मिळाला आहे. 31 डिसेंबरला सोन्याचा दर 75 हजारांवर होता. तो सध्या 1 लाख 22 हजारांवर पोहोचला आहे. भूराजनैतिक संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. याशिवाय जेव्हा डॉलर कमजोर होतो तेव्हा सोनं इतर चलनात खरेदी करणाऱ्यांसाठी स्वस्त होतं. त्यावेळी सोन्याची मागणी वाढते. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपात करण्याची शक्यता असल्यास सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. याशिवाय जगभरातील केंद्रीय बँकांकडून सोने खरेदी केली जात असल्यानं देखील सोन्याची मागणी वाढलेली आहे. विविध केंद्रीय बँकांकडून डॉलर ऐवजी सोने खरेदी करुन ठेवण्यास प्राधान्य दिलं जात आहे.
आणखी वाचा
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
आणखी वाचा
Comments are closed.