भाजपकडून नातेवाईकांसह गुंडागर्दी करणाऱ्यांना लोकांना तिकीट, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
हर्षवर्धन सपकाळ भाजपवर भाजपने राज्यात कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले आणि त्यांच्या नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उतरवल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कोयता गँग, मॉब लिंचिंग, ड्रग्स विक्रेते गुंडागर्दी करणाऱ्यांना भाजपने तिकीट दिल्याचा आरोप देखील सपकाळांनी केलाय. रावणालाही एवढा अहंकार नव्हता एवढा भारतीय जनता पार्टी दाखवत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच अजित पवारांचे निधी देण्यासंदर्भातील विधान म्हणजे दादागिरी आहे. ते परभणीच्या पाथरीतील बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपसह राष्ट्रवादीवर टीका केली.
गुंड प्रवर्तीचे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीने या निवडणूकमध्ये दिलेत
अर्ज काल विड्रॉल झाले आणि आज अशा प्रकारे सभा म्हणजे ही प्रचार सभा नसून विजयी सभा असल्याचे सपकाळ म्हणाले. गली गली मे शोर है और कौन चोर है याचे उत्तर आता जनतेला मिळालेलं आहे. आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते तर काही ठिकाणी आम्ही आघाडीवर लढत आहोत तर काही ठिकाणी मैत्री पूर्ण लढत सुरू आहे. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून लढत नाही. नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी त्यांच्या पत्नी यांच्या बहिणी त्यांची भाचे त्यांचे मामेभाऊ यांना उभ करून भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर दुसरीकडे मॉब लिंचिंगवाले कोयता गॅंग वाली अशा आरोपींना त्यांनी तिकीट दिले आहे. कार्यकर्त्यांना बाद करून एकीकडे घरातले उमेदवार तर गुंड प्रवर्तीचे गुन्हेगार भारतीय जनता पार्टीने या निवडणूकमध्ये दिल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भाजपकडून लोकशाही गुंडाळून टाकण्याचं काम सुरु
चिखलदरा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे दुसरे मामे भाऊ ते अमरावतीचे रहिवासी असून त्यांना चिखलदरा येथे उभा केले आणि त्यांच्याविरोधीतील सात लोकांना त्यांनी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन फार्म विड्राल करायला लावल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तर अहिल्यानगरमध्ये पोलीस येतात ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांना पकडून नेतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात रात्री पोलिसांच्या गाडीतून विखे पाटील साहेबांच्या घरी नेतात विखे साहेब त्यांना चित्रपटामध्ये खलनायक जसा वागतो कशाप्रकारे त्यांना दोष देतात असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. लोकशाही गुंडाळून टाकण्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्र मध्ये करत आहे पुरोगामी महाराष्ट्राला अ शोभणी आहे.
रवींद्र चव्हाण हे विकृतीची सेंचुरी मारल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. तुम्ही सत्तेत असून सत्तेची तुम्हाला एवढी हाव आहे की तुम्ही निवडणुकाही होऊ देत नाही. रावणालाही एवढा अहंकार नव्हता एवढा भारतीय जनता पार्टी दाखवत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
आणखी वाचा
Comments are closed.