2047 पर्यंत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता येणार नाही, बावनकुळेंना विश्वास
Chandrashekhar Bawankule on Congress : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपापल्या उमेदवारांचा प्रचार सुरु केला आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका (Chandrashekhar Bawankule on Congress) केली. 2047 पर्यंत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसची सत्ता येणार नाही. त्यांच्याकडे विकासाचटे व्हिजन नसल्याचे बावनकुळे म्हणाले. ते वाशिममध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
केंद्रात आणि राज्यात 2047 पर्यंत काँग्रेस ची सत्ता येणार नाही असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. कारण काँग्रेसकडे विकासाचे व्हिजन नाही. या निवडणुकीत फडणवीस सरकारला महाराष्ट्रातील जनतेने 1 कोटी अधिक मतांनी निवडून दिले आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती ला 3 कोटी 18 लाख मतं आहेत. तर काँग्रेस सह महाविकास आघाडी ला 2 कोटी 18 लाख मतं मिळाली आहेत. 2029 मध्येही राज्यात भाजपा महायुतीचं सरकार येणार अल्याचे बावनकुळे म्हणाले. कारण तो पर्यंत भाजपा महायुती मोठे विकासाची कामे करणार आहे. तो पर्यंत काँग्रेस महाविकास आघाडी किंचित किंचित होणार असल्याची टीका महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते वाशिम च्या मालेगांव शहरात भाजपा च्या नगराध्यक्ष नागेश बळी आणि 17 नगर सेवकांच्या प्रचारासाठी तसेच भाजपा कार्यकर्ता मेळाव्या साठी आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेस ही किंचित पार्टी राहील
काँग्रेसवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “एका कार्यकर्त्याने काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. कारण सांगताना तो म्हणाला की, विजय वडेट्टीवार हे नाना पटोले यांचं तोंड बघायला तयार नाहीत. नाना पटोले हे विजय वडेट्टीवार यांचं तोंड बघायला तयार नाहीत. दोघेही मिळून सुनील केदार यांचं तोंड पाहायला तयार नाहीत. तिघेही मिळून यशोमती ठाकूर यांना विचारत नाहीत. चौघेही मिळून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही विचारत नाहीत आणि पाचही जण मिळून राहुल गांधींना विचारत नाहीत. काँग्रेस पक्षात मोठा विसंवाद आहे. 2029 पर्यंत काँग्रेस पार्टी ही किंचित पार्टी राहिल. काँग्रेस पार्टी नेतृत्वहीन झाली आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.
महत्वाच्या बातम्या:
Chandrashekhar Bawankule VIDEO : मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता तुम्ही करू नका; चंद्रशेखर बावनकुळे भाजप जिल्हाध्यक्षांना नेमकं काय म्हणाले?
आणखी वाचा
Comments are closed.