हर्षवर्धन सपकाळांना कोणीही ओळखत नाही, मी कशाला वेळ घालवू, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज बुलढाण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणीही त्यांना ओळखत नाही. मी कशाला त्यांच्यावर वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक टोला लगावला.
सपकाळांना कोणी ओळखत नाही, मानत नाही
मी सकारात्मक मत मागण्यासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांना कोणी ओळखत नाही ज्यांना कोणी मानत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेला त्यांच्या जिल्ह्यात जाऊन दिले प्रतिउत्तर दिलं. चिखली शहर भारतीय जनता पार्टीच महायुतीच शहर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. चिखली शहरात चौकात ज्या ज्या वेळी मी आलो ज्या ज्या वेळी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली. त्या त्या वेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचे बटण दाबले भारतीय जनता पक्षाला विजयी केल्याचे फडणवीस म्हणाले. मला विश्वास आहे मला तुम्ही निराश केलं नाही आताही निराश करणार नाही.
नेमकं काय म्हणाले होते सपकाळ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा आका, दरिंदा देवेंद्र फडणवीस असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळी यांनी केली होती. बीड जिल्ह्यात नार्को टेस्टची चर्चा होते आहे. पण कुणाची नार्को टेस्ट करा नाहीतर न करा मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. जाती-जातींत भांडण लावणाऱ्या फडणवीसांची नार्को टेस्ट झाली, तर सगळे सत्य बाहेर येईल,’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. बीड जिल्ह्यात मी मागच्या सहा महिन्यापूर्वी आलो होतो. आणि इथून सद्भावना यात्रा काढली होती. आताही पुन्हा एकदा आलो आहे. इथल्या जातीयवादाला मूठमाती आपण द्यावी,’ असे आवाहनही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले. सपकाळ यांच्या टीकेनंतर भाजपच्या कार्यतर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. सपकाळ यांची जीभ घसरल्याने त्यांनी फडणवीसांविषयी वापरलेले अपशब्द अमान्य असून, त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला होता.
महत्वाच्या बातम्या:
भाजपकडून नातेवाईकांसह गुंडागर्दी करणाऱ्यांना लोकांना तिकीट, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार
आणखी वाचा
Comments are closed.