निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजपवर आरोप; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे कृत्य कितपत योग्य?


Chandrashekhar Bawankule on Nilesh Rane : निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग (Election Commission) त्यासंदर्भात कारवाई करते. पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते. या घटनेत घरात पैसे सापडले आहे, बेडरूममध्ये पैसे ठेवलेले दिसत आहे. ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारातून आले का, ते अन्य कोणत्या व्यवहारातून आले? कोणत्या कारणासाठी ते पैसे आहे, याची चौकशी करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात पैसे वाटताना कोणी पकडले गेले, तर निवडणूक आयोग तत्काळ कारवाई करतो, परंतु हे पैसे घरी सापडले असल्याने याची चौकशी करणे आवश्यक आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. चुकीचे पैसे असतील, तर कारवाई होणं आवश्यक आहे. चुकीचे व्यवहार असतील तर पोलिसांकडून आणि निवडणूक आयोगाकडूनही कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीहे.

त्यांच्या घरात पैसे का होते, कुठून आणले, कोणत्या व्यवहारातून आणले. हे सर्व तपासणे आवश्यक आहे. फक्त आज असं म्हणणं की भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले आणि एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे, हे योग्य नसल्याचीहे अभिप्राय चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

Chandrashekhar Bawankule : निलेश राणे यांनी हे असं का केलं, हे मला समजत नाही

निलेश राणे यांनी हे असं का केलं, हे मला समजत नाही. पण बेडरूमपर्यंत जाऊन अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणे हे निश्चितच नियमबाह्य वाटतं. त्याऐवजी त्यांनी हे प्रकरण पोघेतलास किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं असतं, तर अधिक योग्य ठरलं असतं. या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत व्हिडिओ शूट करणे निश्चितच नियमबाह्य

शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल (26 नोव्हेंबर) थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. विजय किंजवडेकर यांच्या घरी बेहिशोबी 25 लाख रुपये मिळाले. एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत हे पैसे असल्याचे दिसून आले.निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते, कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते, भारतीय जनता पार्टीचे मालवण येथे रणजीत देसाई, मोहन सावंत असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर मुंबईमधून कित्येक लोक पैसे वाटण्यासाठी खास येथे आलेले आहेत, यावर निवडणूक आयोग काय शासन करणार त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असं म्हणत निलेश राणेंनी भाजपवर दोष केले होते. या प्रकरणी आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.