कमी दरात स्क्रॅप मटेरियल पुरवठा करण्याचं अमिष, कोट्यावधी रुपयांची फसवणूक, मोठे रॅकेट समोर
गुन्हे बातम्या ठेवा: दुबई टांझानियाचे स्क्रॅप मटेरियल भारतात आणून कमी दरात पुरवठा करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. दुबई, टांझानिया येथे जाऊन विश्वास संपादित करत व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. व्यापाऱ्यांना ‘स्क्रॅप मटेरियल’ पुरवण्याचा बहाण्याखाली फसवणुकीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. भारतातील विविध शहरातील व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. रॅकेटचा मुख्य सूत्रधार भूपेंद्रसिंग उर्फ संजय कुमार राघव याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
दुबई व टांझानिया देशातून कमी दरात ‘स्क्रॅप मटेरियल’ मिळवून भारतात पुरवठा करण्याचे आमिष दाखवून अनेक व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेट पुण्यातील खडक पोलिसांनी उघडकीस आणलं आहे. या प्रकरणात मास्टरमाईंड ला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांब्याची भांडी बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कच्चा माल लागतो. डिसेंबर 2023 मध्ये या व्यापाऱ्याची मुंबईत इंडो आर्फी मेटलस आणि सबपर्ला इंटरनॅशनल एल एल पी चे मालक भूपेंद्रसिंग उर्फ संजय कुमार राघव आणि त्याचा मुलगा पनवीरसिंग राघव याच्याशी झाली. या दोघांनी त्या व्यापाऱ्याला दुबई येथे ऑफिस असून त्यांना लागणाऱ्या स्क्रॅप मटेरियल ची कंपनी टांझानिया मध्ये असल्याची बतावणी केली. त्यांच्या भूलथापाला बळी पडून संबंधित फिर्यादी हे त्यांच्यासोबत दुबईला गेले तसेच पुढे टांझानिया येथे गेले. विश्वास संपादन करण्यासाठी या बाप लेकांनी त्यांना स्क्रॅप मटेरियलचा तब्बल 75 टन माल दाखवला. हा माल भारतात निर्यात केला जाईल असं सांगितलं.
बाप लेकांनी मिळून कोलकाता, केरळ, ओडिशा, पंजाबमध्ये अनेकांना फसवलं
विश्वास संपादन झाल्युळे संबंधित व्यावसायिकाने त्यांच्याशी करार केला. या व्यवहारापोटी व्यावसायिकाकडून 3 कोटी 79 लाख 77 हजार रुपये अबू धाबी येथील बँकेत स्वीकारले गेले. रक्कम भरल्यानंतर व्यावसायिकाला आजपर्यंत कुठलाही कच्चा माल नाही मिळाला, न त्यांनी भरलेले पैसे परत मिळाले. याबाबत व्यापाऱ्याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच खडक पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. तपासादरम्यान राघव हा कोलकाता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खडक पोलिसांच्या एका पथकाने थेट कोलकाता गाठलं आणि राघव याला ताब्यात घेतलं. या बाप लेकांनी मिळून कोलकाता, केरळ, ओडिशा, पंजाब सारख्या राज्यातील अनेक शहरात अनेकाना फसवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
आणखी वाचा
Comments are closed.