मंचरमध्ये राष्ट्रवादीच्या मंचावरून शिवाजी आढळरावांनी कोणाचा प्रचार केला, घड्याळाचा की धनुष्यबाण


पुणे: लोकसभेवेळी शिवबंधनाच्या हाती घड्याळ बांधलेल्या शिवाजी आढळरावांच्या (Shivajirao Adhalrao Patil) मनात अजून ही धनुष्यबाणचं आहे का? असा प्रश्न मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या एका सभेमुळं उपस्थित झाला आहे. शिंदेंच्या शिवसेने विरोधात अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादीने ही सभा आयोजित केली होती, त्यात आढळरावांकडून घड्याळ अन धनुष्यबाण अशा दोन्ही चिन्हाचा प्रचार झाला. घडाळाचं बटन दाबा म्हणण्यापूर्वी आढळरावांच्या तोंडून धनुष्य असा उल्लेख झाला. मग धनुष्यबाण काय? असं आढळराव (Shivajirao Adhalrao Patil)  म्हणताच ते तुमच्या मनातून काय जाणार नाही, अशी मिश्किल टिप्पणी उपस्थितांमधून करण्यात आली. यावर आढळरावांनी (Shivajirao Adhalrao Patil)  असं काही नाही, मला धनु मोरडे म्हणायचं होतं, असं म्हणत स्वतःवर ओढवलेला बाका प्रसंग सावरण्याचा प्रयत्न आढळरवांनी (Shivajirao Adhalrao Patil) केला.

मंचर नगरपंचायत काबीज करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप सोबत युती आहे. त्यांचा सामना थेट शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे, अशा प्रसंगी एकनाथ शिंदेंचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आढळराव नेमका कोणाचा प्रचार करणार? घड्याळाचा की धनुष्यबाणाचा? अशी चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजप युतीने सभेचे आयोजन केलं. दिलीप वळसे पाटलांसोबत आढळराव ही मंचावर उपस्थित राहिले. पण भाषणात आढळरावांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा म्हणण्यापूर्वी धनुष्य असा उल्लेख केला आणि मग ओढवलेला बाका प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला.

Shivajirao Adhalrao Patil : नेमकं काय म्हणाले आढळराव पाटील?

आम्हाला बरं वाटतंय की आम्ही काम करतोय, लोक आम्हाला सांगत आहेत, मंचरमध्ये हे कधी झालं नव्हतं ते आता होत आहे, मंचर शहर जरी मोठं असलं तरी चांगली परंपरा या मंचर शहराला आहे, विरोधाला विरोध करायचा म्हणून मंचर विरोध करत नाही, मला आठवतं मी पहिल्यांदा निवडणुकीला उभारलो होतो, माजी खासदार कैलासवासी किसन राव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, माझा पक्ष कुठला आणि त्यांचा पक्ष कुठला याचा विचार न करता, अतिशय खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे राहून त्यांनी 2004 ते 2009 या निवडणुकीमध्ये साथ दिली, त्यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय परिणामांची पर्वा केली नाही, ही मंचरची संस्कृती आहे, म्हणून मला आपल्याला सांगायचे हे निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने नव्हे तर येणाऱ्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, येणाऱ्या पिढीला मंचर शहराकडून काहीतरी मिळालं पाहिजे, आपल्याला मंचर शहर उभा करायचं आहे, हे करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपण धनु… घड्याळ आणि कमळ… धनुष्यबाण असं काही नाही, तेव्हा उपस्थितांमधून म्हटलं गेलं तुमच्या मनातून काय जाणार नाही तेव्हा आढळराव म्हणाले असं काही नाही, मला सांगायचं धनु मोरडे असं म्हणायचं होतं मला, आणि म्हणून सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा युतीच्या उमेदवारांना विजय करा असा आवाहन देखील त्यांनी केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.