शिक्षण क्षेत्रात काम, भारतीय संस्कारांचा वारसा, यश बिर्लांनी नव्या उद्योजकांना कोणता मंत्र दिला
मुंबई : उद्योजक यश बिर्ला यांनी एबीपी माझाच्या माझा महाकट्टा या विशेष कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी बिर्ला कुटुंबाला असलेला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा, शालेय जीवन, व्यवसाय, शिक्षण क्षेत्रातील काम, संस्कारांचं महत्त्व यावर यश बिर्ला यांनी संवाद साधला. शिक्षण हा व्यवसाय नसून सामाजिक सेवा असल्याचं यश बिर्लांनी म्हटलं. शिक्षणात संस्कार महत्त्वाचे असतात, असंही त्यांनी म्हटलं.
स्वातंत्र्यलढ्याच्या वारशाबाबत यश बिर्लांना काय वाटतं?
टाटा बिर्ला कवितेप्रमाणं वाटतं पण असं आहे, माझ्या पूर्वजांनी व्यवसाय केला पण त्याच्या पेक्षा जास्त देशभक्ती, सामाजिक सेवा, धर्म आणि जबाबदारी, भगवतगीतेतील सिद्धांत आहे, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करु नये, तोच सिद्धांत पूर्वजांनी राबवला. आम्ही व्यवसायात जी वाढ करु ते लोकांच्याबरोबर शेअर करु, असं यश बिर्ला यांनी म्हटलं. टाटा- बिर्ला यांचे व्यवसाय स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेले व्यवसाय होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतलं होता त्यामुळं महत्त्व दिलं गेलं. माझ्या पूर्वजांनी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत काम केलं, यश बिर्ला म्हणाले.
उद्योजक होणं आमचं कर्म आहे. प्रमुख गोष्ट आहे की आपण जसे आहोत तसा विचार करण्यास आणि व्यक्त होताना संकोच करु नये. मला सांगितलं गेलं की होतं, कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून विमानात चढताना सूट घालून चढलं पाहिजे असं सांगितलं होतं. त्यांचं सांगणं योग्य होतं. मात्र, मला जिथं सुसह्य वाटेल, कम्फर्ट वाटेल असं राहण्याचा प्रयत्न केला. प्रमुख गोष्ट आपले संस्कार आहेत. आपलं ह्रदय, आपला आत्मा खरेपणानं राहील, असं यश बिर्लांनी म्हटलं.
बिर्ला असण्याची जाणीव कधी झाली?
बिर्ला असणं म्हणजे पैसेवाले असणं अशी ओळख असते. पण, मला त्यातून शाळेत कम्फर्ट मिळत नसे. आमच्या पूर्वजांनी व्यवसायात यश मिळवलं. बिर्ला असं कोणी हाक मारली तर मी त्यांना यश नावानं हाक मारा, असं सांगायचो. नेहरु, गांधी, वल्लभभाई पटेल यांनी ज्या आदर्शांनी स्वातंत्र्य मिळवलं. त्यांच्यासोबत बिर्लांनी काम करुन स्वातंत्र्य मिळवलं. बिर्ला नाव आदर्शासाठी घेतलं गेलं तर त्याचा अभिमान वाटायचा. पैशांसाठी नाव घेतलं जायचं तर मी दूर राहायचो. वडिलांची मर्सिडीज गाडी होती, मला शाळेत सोडायचे. मी कधी कधी दूर सोडायला सांगायचो. मला मित्रांपेक्षा वेगळं राहायचं नव्हतं, त्यांच्यात मिळून मिसळून राहायचं होतं. चांगला माणूस बनायचा प्रयत्न करा, जग सुरु राहतं, असं यश बिर्लांनी म्हटलं.
यश बिर्लांना मराठी जेवणाची आवड
यश बिर्लांनी त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्याचं सांगितलं. अवंती यांच्यासोबत महाविद्यालयात ओळख झाली. त्यावेळी मारवाडी कुटुंबातील मुलांची लग्न मारवाडी कुटुंबातील मुलींसोबत व्हायची. मात्र, वडिलांकडे लग्नासाठी हो म्हणण्याचा आग्रह धरला. यश बिर्ला यांनी शुद्ध शाहाकारी असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रीयन जेवण पसंत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मराठी भाषा शिकली होती, पाचवी ते सातवी पर्यंत शिकली होती. मारवाडी डीएनए मिटवला जाईल अशी भीती वाटल्यानं मराठी अनलर्न केली, असं यश बिर्लांनी म्हटलं. 22-23 वर्षापासून व्यायाम केला. प्राणायम केलं, सात्विक आहार सुरु ठेवला. मद्यपान कधी केलं नाही, असं यश बिर्लांनी म्हटलं.
यश बिर्ला शिक्षण क्षेत्रात काम का करतात?
आपण मनुष्य म्हणून कसे आहोत, संस्कार कसे आहेत. देशाचा महान वारसा कसा शिकला आहे, तो समजून घेत कसा आयुष्यात पुढं वाढवला. माझ्या मतानुसार शिक्षण महत्त्वाचं आहे, लहानपणापासून मुलांमध्ये संस्कार रुजवले पाहिजेत. शिक्षण व्यवसाय नाही पण समाजसेवा असल्याचं यश बिर्ला म्हणाले. अभ्यासक्रम तयार करणं, शिक्षक प्रशिक्षण, संगणक, एआय लेटेस्ट काही असलं तरी संस्कार असलेलं शिक्षण विसरलो नाही. बिर्ला ओपन माईंडस द्वारे देशभरात 200 शाळा चालवल्या जातात.
आई आणि वडील यांच्यानंतर भगवान आणि गुरु असं आपल्या संस्कारात म्हटलंय. शरीर नश्वर आणि आत्मा अमर आहे, यावर विश्वास होता. भगवतगीता, उपनिषदे यांच्या संस्कारामुळं आई वडील इथंच आहेत,ते आपल्याला दिसत नाहीत. त्यांचं आशीर्वाद प्रेम असेल, अशी धारणा होती. त्यामुळं आई- वडील आणि बहीण यांचं जाणं सहन करु शकलो, असं यश बिर्ला यांनी म्हटलं. कधी कधी वाटायचं कोणाला अधिक आठवायचं, आई, वडील की बहिणीला असं यश बिर्ला म्हणाले.
उद्योगात चुकीचे निर्णय झाले तर काय शिकायला मिळालं याचा विचार केला पाहिजे. त्या चुकीतून आपण काय शिकलो याचा विचार केला पाहिजे, असं यश बिर्ला म्हणाले. प्रत्येक विद्यार्थ्याला महत्त्वकांक्षा असावी, ध्येय असलं पाहिजे, कर्म करत राहिलं पाहिजे, कुटुंब, समाज,देश आणि मानवतेसाठी समर्पण भावनेतून कर्म करावं, असं यश बिर्लांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.