Akola Crime: MIMच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; अकोल्यातील आकोटमध्ये राजकीय गालबोट
अकोला क्राईम न्यूज : अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळपालक बातमी समोर आली आहे. यात एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग 15 च्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या पतीवर आज सकाळच्या सुमारास जीवघेणा हल्ला झालाय. राजेश तेलगोटे असे जखमी झालेल्या उमेदवाराच्या पतीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणुकीच्या प्रचारच्या शेवटच्या दिवसात्यामुळे गालबोट लागल्याचे बघायला मिळालं आहे.
Akola Crime News : अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसारमॉर्निंग वॉकवरून घरी परतीच्या प्रवासात असताना अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची माहिती समजतात तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान याप्रकरणी अकोट शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूये. मात्र, या घटनेने अकोटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजेश तेलगोटे हे एमआयएमचे नगरसेवक पदाचे उमेदवार उज्वला तेलगोटे यांचे पती आहेत. राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आज नगरपालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दिवसाच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली आहे.
काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर शाही फेकण्याची घटना; बुलढाण्यात मतदानापूर्वी तणावपूर्ण शांतता
बुलढाणा शहरातील तेलगूनगर परिसरात आज सकाळी काँग्रेस नगरसेवकाच्या प्रचार बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शाही फेकल्याची घटना उघडकीस आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाही फेकण्यामागील हेतू, तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
उद्या मतदान; प्रशासन सतर्क
उद्या सकाळपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होत आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या अप्रिय प्रकारामुळे निवडणूक प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची सूचना दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.