संभाजीनगरमधील तोतया IAS अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे उघड; पद्मश्री पुरस्काराची ऑफर देऊन चुना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर) शहरसह राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बनावट आयएएस अधिकारी कल्पना भागवत (Fake IAS officer Kalpana Bhagwat) प्रकरणात अत्यंत गंभीर आणि नवीन खुलासे समोर आले आहेत. तोतया आयएएस कल्पना भागवत प्रकरणात आता आणखी नवे धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री (Padma Shri awards) मिळून देते म्हणून छत्रपती संभाजीनगआणि, अमरावतीहिंगोली अहिल्यानगरच्या अनेक नेत्यांना तोतया आयएएस कल्पना भागवत फसवल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्याकडून पैसेही उकळल्याची माहिती समोर आली आहे.

Fake IAS officer Kalpana Bhagwat : लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचे ऑफर देत पैसे उकळघ्या

नागपूरमधील एका नेत्याला राज्यसभेची ऑफर देत हे पैसे उकळण्यात्यामुळे आल्याची माहिती आहे. तर आरोपीतील डिंपी हा दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून काम केलेला व्यक्ती असून डिंपी हरजाई हा कल्पना भागवतला पद्मश्री आणि राज्यसभा देण्याची ऑफर देत होता. तर दुसरीकडे कल्पनाहे लोकांना पद्मश्री आणि राज्यसभा देण्याचे ऑफर देत पैसे उकळत होती. आत्तापर्यंत पोलिसांनी कल्पना भागवतच्या संपर्कात असलेल्या 28 जणांना नोटीस दिल्या आहेत. त्यामध्ये नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले पठाण यांचाहे समावेश आहे.

या प्रकरणी आता सिडको पोलिसांनी पठाण यांचा जबाब नोंदवून घेतलाहे. धक्कादेणारा बाब म्हणजे कल्पना भागवतकडे केंद्रातील ऊर्जा खात्यातील सेक्रेटरी असल्यासही फेक लेटर मिळालं आहे. त्यामुळे कल्पना भागवतचे अनेक कारणामे पोलीस तपासात समोर येत असून भगवत्यांचे पाय आणखी खोलात असल्याची दाट शक्यता पोलिसांना आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पोलिस तपासादरम्यान समोर आलेले कारणामे

– कल्पना भागवत ही महिला जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे.
– ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
– ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती आश्वासन देते.
– मोठ्या बदल्याचं काम करण्याचं आश्वासन देखील ती देते.
– पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे. तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलीस तपास करत आहेत.
– लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
– सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
– प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.

हे हि वाचा

आणखी वाचा

Comments are closed.