कोर्टाच्या एका निर्णयाने निवडणूक आयोगाचा नियोजित प्लॅन फिस्कटला, आगामी निवडणुकांबाबत मोठा निर्ण
महाराष्ट्र झेडपी आणि महानगरपालिका निवडणुकीच्या बातम्या: उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करा, असे निर्देश निवडणूक आयोगाला (Election Commission) दिले होते. काल नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) मतदान पार पडले होते. यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. मात्र, 24 नगरपरिषदांमध्ये काही प्रभागांमधील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. या नगरपरिषदांमध्ये 20 डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर करावे, असे निर्देश केली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका झाली होती. तसेच नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलल्याने आगामी जिल्हा परिषद (ZP Election) आणि महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. (Mahanagarpalika Election)
यापूर्वी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषद-नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे निश्चित केले होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.
BMC Election 2026: राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांची बैठक बोलावली
राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणुका जिल्हा परिषदांच्या आधी घेण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या हरकती आल्या असतील त्यांना 10 डिसेंबरपर्यंत उत्तरं देऊन टाकावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना दिले जाण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचे वकील…’
आणखी वाचा
Comments are closed.