भाजपच्या 175 जागा आल्यास ईव्हीएम हॅक करुन निवडणुका जिंकल्याचं सिद्ध होईल; काँग्रेसचा दावा
मुंबई: निवडणूक (Election) आयोगाने राज्यातील बकाही नगराध्यक्षपदाच्या आणि हुतांश नगरपालिकेच्या प्रभागातील निवडणुका पुढे ढकल्याने एकच गोंधळ उडाला. त्यातच, राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान सुरू असतानाच 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीखही पुढे ढकलण्यात आली असून आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यावरुन, राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक आयोग आणि राज्य सरकारचं साटेलोटं असल्याचा आरोप केला असून काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर अभियोग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तर, विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनीही ईव्हीएम घोळावर भाष्य केले आहे.
ईव्हीएम संदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर निकालासाठी 20 दिवस थांबायची वेळ का आहे? राज्यातील 268 पैकी 175 जागा भाजपच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलतात, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही कोणते दिवे लावले, ज्याने इतक्या जागा येईल? असेही त्यांनी म्हटले. लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून लाडक्या बहिणीच्या नावाने निवडून आले. EVM मध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न आहे. जर भाजपच्या 175 जागा आल्या तर भाजपने बेईमानी करुन, ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
निवडणूक ईव्हीएम मशिनच्या स्ट्राँग रुमबाहेर अनेक ठिकाणी गडबड आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जॅमर लावा. रुमबाहेर मोठी स्क्रीन लावा, उमेदवाराला लाईव्हचे ऍक्सेस द्या. पण हे करायला निवडणूक आयोग तयार नाही, म्हणजे सरकारचा 175 जागा मशिनच्या आधारावर जिंकणे हे टार्गेट आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
एका मताचे 20 हजार रुपये – वडेट्टीवार
ईव्हीएम हॅक केल्यावर बाहेरून केल्यात, ही पळवाट आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतात 20 हजार एक मताचे दिले. कामठीत तसे आरोप केले आहेत. उमेदवार फार्म हाऊसमधील घटनेचा उल्लेख करत मत मिळत नसल्याने निवडणुका लांबणीवर टाकल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सरकारने याबाबत बाजू मांडली नाही, त्यांना कारण घोळ करायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
14 डिसेंबर रोजी दिल्लीत मोर्चा
नगरपालिका निवडणुकीत प्रशासनाचा गोंधळ आढळला असून त्यांचं अपयश म्हणजे लोकशाही बुडत आहे. हा कारभार व्होट चोरीचा होता, राहुल गांधी टीका करत होते त्यावेळी त्यांना देशद्रोही म्हटलं होतं. मग, आता मुख्यमंत्री फडणवीस हेच टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, देशात आम्ही रॅली काढणार आहतो, 14 डिसेंबर रोजी दिल्लीत रॅली काढणार आहोत. चोर मुख्यमंत्री आता दिंडोरा पिटत आहेत, सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पानं पुसायची आहेत. कारण, फडणवीस यांनी केंद्राकडे निधी मागितला नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.