राज्य सरकारच्या उदासीनतेने महाराष्ट्रातील 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीतील नोकरीची संधी हुकली
जर्मनी मध्ये नोकरी महाराष्ट्र गेल्या काही वर्षांमध्ये दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील रोजगार कमी होत चालले असतानाच आता राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील 10 विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची (Jobs in foregin country) संधी हुकल्याची माहिती समोर आली आहे. 2024 साली जर्मनीत (Germany) राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा शासन निर्णय जारी करुन सुद्धा वर्षभरात मनुष्यबळ राज्य सरकारकडून पाठवलंच गेलं नाही, अशी माहिती आता समोर येत आहे. एकीकडे राज्यात बेरोजगारीची (Unemployment) समस्या असताना महायुती सरकारने (Mahayuti) परदेशात सहजपणे उपलब्ध होऊ शकणाऱ्या नोकऱ्यांच्या संधीविषयी दाखवलेल्या या उदासीनतेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. (Maharashtra and Germany agreement)
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल कामगार आणि प्रोफेशनल यांना जर्मनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार होती. दहा हजार विद्यार्थ्यांना या शासन निर्णयानुसार जर्मनीमध्ये पाठवण्यास मान्यता मिळाली होती. ज्यामध्ये जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी 70 कोटी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना नोकरीसाठी तयार करणे याचा समावेश आहे.
यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता, उद्योग,कृषी, वैद्यकीय शिक्षण या विभागातून हे मनुष्यबळ तयार करून जर्मनीला पाठवण्यात येणार होते. मात्र, दहा हजार पैकी एकही विद्यार्थ्याला ही संधी मिळाली नसल्याची माहिती आता समोर आली आहे. या सगळ्या संदर्भात जर्मनीतील मंत्री आणि अधिकारी, त्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी हे राज्य सरकारची चर्चा करण्यासाठी मुंबईत आज येणार आहेत. या विद्यार्थ्यांना आणि गरजूंना ही संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न शासकीय मान्यताप्राप्त रिक्रुटमेंट एजंट यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे, अशी माहिती सरकारी मान्यता प्राप्त रिक्रुटमेंट एजंट चित्रा उबाळे यांनी दिली. यावर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, जर्मनीसारख्या देशात महाराष्ट्रातील 10 हजार विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध असताना राज्य सरकारने इतकी उदासीनता का दाखवली, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
Mumbai news: मुंबईत शाळेच्या ट्रस्टींमध्ये वाद, विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिकण्याची वेळ
मुंबईच्या मालाड पूर्वेत आप्पा पाडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड आप्पा पाडा परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील गॅलरीमध्ये बसून शिकण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या मोठ्या संख्या मध्ये विद्यार्थ्यांना मागील चार दिवसापासून गॅलरी आणि मोकळ्या जागा मध्ये शिकवला जात आहे. स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये दोन ट्रस्टीचा आपसात वाद सुरू आहे. या दोन्ही ट्रस्टीचा केस चॅरिटी कमिशनकडे सुरू आहे.
मात्र, एका ट्रस्टीकडून शाळेतील क्लासरूम मध्ये टाळे लावल्यामुळे शाळेतील मोठा संख्या मध्ये विद्यार्थ्यांना गॅलरी आणि उघड्यावर शिकत आहेत. शाळेतील मुलांचा क्लासरूममध्ये टाळे लावल्यामुळे पालक आणि शिक्षक वर्गामध्ये मोठी नाराजी आहे. स्वामी विवेकानंद शाळेची गॅलरी आणि मोकळ्या जागेत शिक्षक मुलांना शिकवत असल्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक आणि प्रिन्सिपलकडून प्रशासनाला लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे.
आणखी वाचा
बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, पगार मिळणार 86000 रुपये, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता?
आणखी वाचा
Comments are closed.