सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळल
रत्नागिरी/कोल्हापूर : राज्यात अपघातांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच एक भीषण अपघात अंबा घाटात (Amba Ghat Bus Accident) आज (शुक्रवारी, ता 5) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रशहरातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा अपघात (Amba Ghat Bus Accident) झाला आहे. मध्यप्रदेशचे पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आलेले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Amba Ghat Bus Accident)
Amba Ghat Bus Accident : बस एका मोठ्या झाडावर आदळल्याने ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून वाचली
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील 15 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. अपघात तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. आज भल्यापहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आंबा घाटातील चक्री वळणाजवळ ही दुर्घटना घडली आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. मात्र दरीत खाली जात असताना बस एका मोठ्या झाडावर आदळल्याने ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून वाचली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.(Amba Ghat Bus Accident)
Amba Ghat Bus Accident : जखमींना तातडीने रुग्णालयात केलं दाखल
ही भीषण अपघाताची घटना रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या हद्दीत घडली असून पोलिस पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. संबंधित बस मध्यप्रदेशातील भिंड येथील असल्याचे समोर आले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.(Amba Ghat Bus Accident)
आणखी वाचा
Comments are closed.