पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ


गुन्हे बातम्या ठेवा: पुणे (Pune) जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी काही संशयितांनी बंद घरासमोर जादूटोणा (Black Magic) केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करत होता. दारात दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावले आणि त्यानंतर नारळ फोडले. इतकंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Pune Crime News: नागरिकांनी प्रश्न विचारला तर ‘मुंबईहून आलोय’ उत्तर

घटना घडत असताना काही नागरिकांनी त्या पुरुषाला विचारपूस केली असता तो “मुंबईहून आलोय” असे सांगून तिथून निघून गेला. मात्र त्याने कोणत्या कारणासाठी हे कृत्य केले, कोणाच्या सांगण्यावरून केले, याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही.

Pune Crime News: जमिनीच्या वादातून जादूटोणा?

स्थानिकांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू आहे. त्यामुळे या वादातूनच विरोधकांना घाबरवण्यासाठी किंवा दडपण आणण्यासाठी हा जादूटोणा करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरलीय.

Pune Crime News: मौजमजेसाठी दागिने चोरणारा अट्टल चोर जाळ्यात

दरम्यान, पुण्यात मौजमजेच्या हव्यासातून दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उत्तम पठारे असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील विविध दुकानांत जाऊन सोन्याचे दागिने चोरत होता. चोरी केलेले दागिने विकून मिळालेला पैसा तो नर्तिकेवर खर्च करत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून 6 लाख रुपये किंमतीचे सुमारे 5 तोळे सोने जप्त केले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Leopard Attack: ‘अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी’, नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना, रात्री सव्वा आठच्या सुमारास नेमकं काय घडलं?

Solapur Crime News: 12 वर्षांपासून रिलेशनशिप, दोन वर्षाचा संसार, भांडणानंतर त्यानं दुसरीकडे लग्नाचा घाट घातला, व्हिडिओ बनवून तृतीयपंथीयने गळ्याला लावला दोर, सोलापुरात नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.