धक्कादायक! जालन्यात ऊस तोडीच्या व्यवहारातून 40 वर्षीय महिलेचा खून, मुकादम अटक


जालना क्राईम न्यूज : ऊस तोडीच्या पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून 40 वर्षीय महिलेचा रक्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जवखेडा बुद्रुक परिसरात ही घटना घडली आहे. उषाबाई सदाशिवे असे मृत महिलेचे नाव आहे. दुपारी जवखेडा शिवारात एका कापसाच्या शेतात या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

प्राथमिक तपासात गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न

प्राथमिक तपासात गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत. यावेळी पोलिसांनी ऊस तोडीचा मुकादम असलेल्या आरोपी शरद राऊत याला संशयावरून ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाव प्रवासी दहशतीत, चोरीच्या घटना वाढल्या

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणारे प्रवासी दहशतीत आहेत. या मार्गावर चोरीच्या घटना वाढल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. एखाद्या सिनेमाला शोभेल अशी चोरी चोरट्यांच्या माध्यमातून ट्रॅव्हल्स मध्ये होत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. ज्या व्हिडिओत चोरटे चालत्या ट्रॅव्हल्सवर चढून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत आहेत. ही संपूर्ण घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची आहे.

प्रवासी वाहन अडवून प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे

सोलापूर ते धुळे महामार्गावर पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून अथवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे.. याबरोबरच ट्रॅव्हल्स वर ठेवलेल्या बॅगा लंपास करण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आता बीड पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून अशा पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेतला जात आहे.. यासाठी हॉटेल चालकांची देखील मदत घेतली जात असून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. प्रवाशांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ज्या ठिकाणी जेवणासाठी ट्रॅव्हल्स थांबते ती निघण्यापूर्वी ट्रॅव्हल्सच्या छतावर जाऊन चोरटे थांबतात. त्यानंतर काही अंतरावर गाडी जाताच प्रवाशांच्या बॅगा काढून खाली टाकल्या जातात. खाली असलेले साथीदार या बॅग गोळा करतात आणि त्यातील मौल्यवान वस्तू लंपास करतात.. टोलनाक्यावर अथवा चढाच्या ठिकाणी गाडीची गती कमी होताच वरचा चोरटा उतरून पसार होतो.

महत्वाच्या बातम्या:

सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा, पतीनेच केली हत्या, पाच आरोपींना अटक, AI चा वापर करत गुन्ह्याची उकल

आणखी वाचा

Comments are closed.