बारामतीमध्ये ईडीची छापेमारी सुरू; पुणे, मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांसह मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यां

बारामती: बारामतीमध्ये आज सकाळपासून ईडीची छापेमारी (ED raid) सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची (ED raid) धाडी पडल्याची माहिती आहे. जळोची या लोखंडेंच्या मूळ गावात ईडीची छापेमारी सुरू आहे. पुणे, मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांना १० कोटींना गंडवल्याच्या प्रकरणात ईडीने छापेमारी (ED raid) केली आहे. मंत्रालयातल्या काही कर्मचाऱ्यांनाही गंडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.(ED raid)

बारामती डेअरी प्रायव्हेड लिमीटेडच्या तक्रारीनंतरआनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आनंद लोखंडे  आणि विद्या लोखंडे यांनी बारामती तालुक्यात अनेकांना गंडवलं असल्याची माहिती आहे. मुंबईच्या कंपनीकडून २ कोटींचे बटर, ९३ लाखांचे दूध खरेदी करून हप्ते बुडवले असल्याचंही समोर आलं आहे. पुणे आणि मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १० कोटी रुपयांहून अधिक रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या घोटाळ्यात अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने आज बारामतीमध्ये छापे टाकले आहेत.(ED raid)

बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेडने जळोची (तहसील बारामती) येथील रहिवासी आनंद सतीश लोखंडे (२८) आणि विद्या सतीश लोखंडे (२४) यांच्याविरुद्ध १०,२१,५९,३६७ रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. लोखंडे दाम्पत्यावर पुणे आणि मुंबईतील इतर लोकांनाही अशाच प्रकारे फसवल्याचा आरोप आहे. या जोडप्याने तरुण उद्योजक असल्याचे भासवून एका प्रभावशाली राजकीय नेत्याचे समर्थक असल्याचा दावा केला. बारामती तहसीलमध्ये विविध क्षेत्रात अनेक कंपन्या उघडल्याचा आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे.

या व्यक्ती कशा प्रकारे फसवणूक करायचे हे सूत्रांनी उघड केले. त्यांनी मुंबईतील एका कंपनीकडून २ कोटी रुपयांचे लोणी खरेदी केले आणि आठवड्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले, परंतु कधीही पैसे दिले नाहीत. दूध पुरवठ्याच्या नावाखाली या कंपनीकडून ९३ लाख रुपये घेण्यात आले, परंतु पुरवठा झाला नाही. दूध व्यापाऱ्यांना लाभ देण्याच्या नावाखाली ६.४३ कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली, परंतु निधीचा गैरवापर करण्यात आला. इतर अनेक व्यवहारांमध्ये चेक देण्यात आले, जे बाउन्स झाले. बारामती दाम्पत्याने मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुंतवणूकीचे आमिष दाखवले, ज्यांनी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.