निवडणुकीची भाषणं अंगलट,शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार; आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींच्या निकालाची (Election) तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता, 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असून 20 तारखेला उर्वरित, पुढे ढकलण्यात आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीसाठी निवडणूक घेतली जाईल. मात्र, तत्पूर्वी राज्यात 2 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ-मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा संपन्न झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्‍यांनी जाहीर सभांमधून मतदारांना आवाहन केलं. मात्र, यावेळी निधी देऊ, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे अशी वक्तव्य करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP) निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्यात नागपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी तक्रार केली होती. त्यानुसार, निधीच्या माध्यमातून मतदारांना आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप रविंद्र पवार यांनी केला होता. आता, निवडणूक आयोगाकडून संबंधित तक्रारीची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आचारसंहिता भंग प्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने प्राप्त संबंधित तक्रारीनुसार आचारसंहिता भंग केल्याचं समोर आले असेल तर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक काळातील प्रचारात राज्यातील बड्या नेत्यांच्या भाषणावर आक्षेप घेत रविंद्र पवार यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणातील वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता, निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा

एक्सप्रेस वेवर कार उभी करुन जोडप्यांनी नको नको ते सुरु केलं; मॅनेजरची नजर गेली अन्…, प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं!

आणखी वाचा

Comments are closed.