हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गुंडांचा हल्ला, मुंबईच्या कांदिवली परिसरातील घटना

मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत (Kandivali West in Mumbai) आरोपीच्या टोळीकडून पोलिसांवर (Police) हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. हीच हाणामारी सोडवण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या टोळीकडूनच हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत.

घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल

सध्या, घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आहे आणि सर्व गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई करत आहेत. आरोपीच्या टोळीकडून पोलिसांवर हल्ला केल्यामुळे कांदिवली परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या दोन गटात हाणामारी नेमकी कशामुळं झाली याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.

कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर

दरम्यान, कांदिवलीमध्ये पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदिवली पश्चिम एकता नगरमध्ये, मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला होता. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की या गुंडांना पोलिसांची अजिबात भीती नाही आणि ते धाडसाने पोलिसांवर हात उचलत आहेत. सध्या, घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आहे आणि सर्व गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं गुंडांना पोलिसांची भीती राहीली की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण पोलिसांवरच हल्ला होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक

ओबीसी आंदोलक मंगेश ससाने यांच्या गाडीवर रात्री अज्ञाताकडून दगडफेक करत हल्ला करण्यात आलाय. दोन महिन्यांपूर्वी पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्याकरता अॅड ससाणे हे माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर माजलगाव वरून धारूर कडे जात असताना विसावा हॉटेल च्या पुढे दुचाकी वरून असलेल्या दोन अज्ञातांकडून ससाणे यांच्या गाडीवर दगड फेक करण्यात आली. गाडीच्या मागच्या आणि बाजूच्या काचावर ही दगडफेक केली. यानंतर तात्काळ त्यांनी धारूर पोलीस ठाणे गाठत या हल्ल्याबाबतची माहिती धारूर पोलिसांना दिल्यानंतर धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime News: माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता; जीवघेणा हल्ला झालेल्या PAचा दावा; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.