महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्
बीएमसी निवडणूक 2026 संजय राऊत मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे.
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे- (Sanjay Raut BMC Election 2026)
1. मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. कोणत्याही पदावरच्या, वयाच्या माणसाने या लढाईत उतरायला हवं. आम्ही मुंबई अमित शाह यांच्या घशात जाऊ देणार नाही.
2. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील खर्चासाठी 15 लाखांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. पण सत्ताधारी 15 लाखांपर्यंत मर्यादा पाळणार आहेत का?, यासाठी राज्य निवडणूक आयोग काय करणार आहे?
3. मुंबई, ठाणेकल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक या महापलिकासाठी एकत्र आले आहेत. बाकी ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ.
4. मुंबईसह 29 महापलिकासाठी आम्ही सज्ज आहेत. इतिहासात नोंद राहिली पाहिजे, शिवसेना-मनसे मुंबई आणि मराठी माणसासाठी लढले.
5. काँग्रेस सध्यातरी आमच्यासोबत नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की, स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल. आम्ही सांगितलं भाजपाला मदत होईल असा करू नका.
6. आम्ही बघू कधी युती जाहीर करायची, या आठवड्यात ठाकरे बंधूंची युती जाहीर करणे अपेक्षित आहे. तुम्ही महायुतीला विचारता का तुम्ही युती करणार का?
7. मराठीसाठी संघर्ष झाला तर बलिदान द्यायला तयार आहोत. रहेमान डकैत कोण आहेत?, हे मुंबईला माहिती आहे.
8. आदित्य ठाकरे आज मेळावा घेताय. पक्षासाठी महत्वच्या जबाबदाऱ्या ते घेताय. ही निवडणूक तरुणांची आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या जबाबदाऱ्या दिल्या असतील. मेळावे घेत असतील तर त्याचं आम्ही स्वागत करतो.
9. सर्व घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोग तारखा जाहीर करतं हा आचारसंहितेचा भंग नाही का?
10. मुंबईत काल सगळीकडे मराठी माणसाला साद घालण्यासाठी बॅनर लागले होते. ते पालिकेकडून काढून टाकण्यात आले. पोस्टर्स लावल्याने सरकारला भीती वाटतेय.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.