BMC : मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती! शिवसेना 70% नव्या चेहऱ्यांना संधी देणार
उद्धव ठाकरे शिवसेना : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय पक्षाकडून समोरबांधणीला सुरुवात झाली असून अनुभवी नेतेहे मैदानात उतरले आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना एकनाथ शिंदे (मराठी) यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, याf आणि अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेनाही नवी रणनीती आखल्याची माहिती आहे. ठाकरेंची शिवसेना उमेदवाराची चाचणी करत असताना 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवले जाणार आहे.
उद्धव शक्करे : उद्धव ठाकरेची शिवसेना 70% नव्या चेहरायांना संधी देणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे (मराठी) यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. या बाबतीमध्ये सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत’, असे म्हणत शिंदे गटाने जागावाटपावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गट महायुतीकडे 84 जागांची मागणी करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखली असून, जवळपास 70 टक्के उमेदवार तरुण आणि नवे असतील असा अंदाज आहे. याशिवाय, पडद्यामागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू असल्याचीही चर्चा आहे. तर महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.
Shivsena for BMC Election 2026: शिवसेनेतील युवा नेते त्यासोबतच काही वरिष्ठ नेतेही आग्रही
दरम्याननव्या चेहरांना संधी द्यावी, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील युवा नेते त्यासोबतच काही वरिष्ठ नेते आग्रही असल्याची माहिती आहे. वय वर्ष 30 ते 45 या वयोगटातील बहुतांश उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार म्हणून देणार असल्याची माहिती आहे. मागील काही वर्षात केलेलं काम, तरुण इच्छुक उमेदवाराचा जनसंपर्क, वॉर्डमध्ये सोडवलेल्या समस्या या सगळ्याचा रिपोर्ट पाहूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष फुटीनंतर काही माजी नगरसेवक हे शिंदेंचे शिवसेनेत गेलेत्यामुळेतर काही शिवसेनिकांना आरक्षण सोडतेमुळे फटका बसलाहे. त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशी देखील माहिती आहे.
अनेक युवा चेहऱ्यांची नाव उमेदवारीसाठी चर्चेत
सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण 51 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या माजी नगरसेवकांचा विचार करून अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेत असल्याची माहिती आहे. यात अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फातर्फेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यासारख्या अनेक युवा चेहऱ्यांची नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. काहींना तयारीच्या सूचनाहे देण्यात आल्या आहेत. तर काहींच्या बाबत निर्णय येत्या दोन ते चार दिवसात अपेक्षित आहे, अशी देखील माहिती आहे.
BMC Election 2026 : मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी, मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार असून त्यापैकी 53 टक्के पुरुष मतदार तर 47 टक्के स्त्री मतदार आहे. यातील सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभागात असून कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत. सर्वात जास्त मतदार चांदिवलीतील प्रभाग क्रमांक 164 मध्ये तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा मधील प्रभाग क्रमांक 176 मध्ये आहे. तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहेत.
सर्वाधिक मतदार
कुर्ला एल वॉर्ड – प्रभाग क्रमांक 164 – 62, 945
अंधेरी पूर्व – प्रभाग क्रमांक ६६ – ६१, ७९९
अंधेरी पूर्व – प्रभाग क्रमांक ८४ – ५७, २६१
कमी मतदार
सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक 174 – 30,748
सायन कोळीवाडा- प्रभाग क्रमांक 176 – 30,786
दहिसर – प्रभाग क्रमांक 1- 31,961
कमी महिला मतदार
सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक 174 – 12, 604
गोरेगाव – प्रभाग क्रमांक – 13, 222
सर्वात जास्त महिला मतदार
बोरिवली – प्रभाग क्रमांक 15 – 30, 088
अंधेरी पश्चिम – प्रभाग क्रमांक ६६, ३०, ०४७
एकूण मतदार – 1 कोटी 3 लाख 44 हजार 315
पुरुष मतदार – 55 लाख 16 हजार 707
स्त्री मतदार – 48 लाख 26 हजार 509
तृतीयपंथी – 1099
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.