भाजपला कुठे कुठे धक्का, शिंदे-दादा कुठे कुठे वरचढ ठरले? जाणून घ्या सविस्तर
पुणे: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज (रविवारी, ता २१) सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे, दुपारपर्यंत विजयाचा गुलाल उधळला (Nagarparishad Elections Results) जाईल. काही ठिकाणी मतमोजणीचे कौल समोर येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे.(Nagarparishad Elections Results)
Nagarparishad Elections Results: भाजपला कुठे कुठे धक्का, शिंदे-दादा कुठे कुठे वरचढ ठरले?
नगर परिषद निवडणुकीचे निकाल: मुखेड
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश आले आहे. एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांना राजकारणात पहिले यश मिळाले आहे.
Nagarparishad Elections Results: आटपाडी
आटपाडी नगरपंचायतमध्ये भाजपा सहा जागांवर विजयी झाले आहे, तर शिवसेना शिंदे गट सात जागांवर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले आहेत, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यु.टी जाधव विजयी झाले आहेत.
नगर परिषद निवडणुकीचे निकाल : लातूर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने औसा नगरपरिषदेवर ताबा मिळवला आहे. 23 जागे पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विजय मिळवला आहे. 6 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, गेल्या वेळेस दोन वरून यावेळी काँग्रेस शून्यावर आली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत.
मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर सेनेच्या नगराध्यक्ष पदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर विजय मिळाला आहे. हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये धक्का बसला आहे.
नगरपरिषद निवडणुकीचे निकाल : विटा नगर परिषद
शिवसेना शिंदे पक्षाचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत, तर भाजपचे आठ उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
Nagarparishad Elections Results: कराड
कराडमध्ये भाजपा आणि काँग्रेसला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव 2000 मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले यांचे उमेदवार पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराडमध्ये सभा घेतली होती.
Nagarparishad Elections Results: मोहोळ
मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या चूरशीच्या सामन्यात शिंदे गटाने बाजी मारली आहे.
Nagarparishad Elections Results: जेजुरी
माजी आमदार संजय जगताप यांची सत्ता जेजुरीमध्ये खालसा करण्यात अजित पवारांना यश मिळालं आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घवघवीत यश मिळालं आहे. नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदीप बारभाई विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार तर भाजपाचे 2 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले आहेत.
नगर परिषद निवडणुकीचे निकाल : शिरूर
शिरूर नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐश्वर्या पाचर्णे विजयी झाल्या आहेत. भाजपसह महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे.
भाजप-11
राष्ट्रवादी AP-5
महाविकास आघाडी-7
अपक्ष- 1
नगर परिषद निवडणुकीचे निकाल : मालवण
मालवण नगर परिषदेत मंत्री नितेश राणेंना धक्का बसला आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी झाल्या आहेत. मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेनेच्या १० जागा विजयी तर भाजपला फक्त ५ जागा मिळाल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांना मालवण नगर परिषदेत धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी मुसंडी मारली आहे.
नगर परिषद निवडणुकीचे निकाल : लांजा
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर महायुतीचा दबदबा निर्माण झाला आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा(शिंदे सेना) झेंडा फडकला आहे. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे विजयी झाले आहेत. लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. रत्नागिरी शिवसेनेनी आपला गड राखला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.