भगूरमध्ये अजितदादांचा करिश्मा, त्र्यंबकमध्ये गिरीश महाजनांना धक्का, नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरि

नाशिक जिल्हा नगर परिषद निवडणूक निकाल 2025: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 अंतर्गत शनिवारी (दि. 20) मतदान पार पडले. जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, विशेषतः चांदवड, ओझर आणि सिन्नर या नगरपरिषदेत 68.20 टक्के मतदान नोंदवले गेले. रविवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत दुपारीपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीसाठी एकूण 19 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

एकूण मतदारसंख्या 17,836 असून, त्यांपैकी 12,165 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पुरुष मतदारांचे प्रमाण 67.58 टक्के, तर महिला मतदारांचे प्रमाण 68.20 टक्के राहिले. इतर प्रवर्गातील मतदारांचा सहभाग अत्यल्प नोंदवला गेला. नगरपरिषदनिहाय मतदानाचा विचार करता, चांदवड नगरपरिषदेत 77.67 टक्के, ओझर नगरपरिषदेत 65.63 टक्के, तर सिन्नर नगरपरिषदेत 67.58 टक्के मतदान झाले. सायंकाळच्या सत्रात मतदारांची गर्दी विशेषतः वाढल्याचे चित्र दिसून आले होते.

नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषदेतील निकाल

एकूण 11 जागा, त्यापैकी आतापर्यंत 8 जागांचा निकाल हाती आला आहे:

महायुती

* भाजप – 2 जागा
* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 2 जागा
* शिंदे शिवसेना – 4 जागा

महाविकास आघाडी

*ठाकरे सेना – ०
* राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ०
* काँग्रेस – ०

जिल्हानिहाय प्रमुख निकाल:

1. भगूर: राष्ट्रवादी अजित पवार गट – प्रेरणा बलकवडे विजयी

2. पिंपळगाव बसवंत: भाजप – डॉ. मनोज बर्डे विजयी

3. सिन्नर: राष्ट्रवादी अजित पवार गट – विट्ठलराजे उगले आघाडीवर

4. ओझर: भाजप – अनिता घेगडमल आघाडीवर

5. त्र्यंबकेश्वर: शिंदे शिवसेना – त्रिवेणी तुंगार विजयी

6. इगतपुरी: शिंदे शिवसेना – शालिनी खताळे विजयी

7. येवला: राष्ट्रवादी अजित पवार गट – राजेंद्र लोणारी विजयी (भुजबळ समर्थक)

8. मनमाड: शिंदे शिवसेना – बबलू पाटील आघाडीवर

9. नांदगाव: शिंदे शिवसेना – सागर हिरे विजयी

10. सटाणा: शिंदे शिवसेना – हर्षदा पाटील विजयी

11. चांदवड: भाजप – वैभव बागुल विजयी

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत भगूरमध्ये अजित पवार गटाचे यश, नांदगावमध्ये शिंदे गटाचा बोलबाला आणि भाजपच्या काही नगरपालिकांमध्ये विजयानंतर महायुती, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिंदे शिवसेना यांचा प्रमुख प्रभाव स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडीच्या पक्षांना या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा

Nandgaon Nagarparishad Election Result 2025: मोठी बातमी: सुहास कांदेंनी नांदगावचा गड राखला, शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी; राष्ट्रवादीचा धुव्वा, भुज’बळ’ कमी पडले!

आणखी वाचा

Comments are closed.