महापालिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले…

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारारांचं आणि जनतेचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष निवडून आले. भाजप आणि शिवसेनेला चांगलं यश मिळालं, असं अजित पवार म्हणाले. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची जबाबदारी वाढली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. पत्रकारांनी यावेळी आगामी महापालिका निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढवणार का या प्रश्नावर देखील अजित पवार यांनी उत्तर दिलं.

अनेकदा या जिल्ह्यानं आणि दोन्ही शहरांनी मला साथ दिली आहे. काही ठिकाणी चुरशीच्या निवडणुका होत्या, इंदापूर, भोर, फुरसुंगी आणि उरळी देवाची येथे लोकांनी साथ दिली. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेला लोकांनी साथ दिली, असं अजित पवार म्हणाले.  पुण्यात चाचपणी करतोय, असंही अजित पवार यांनी म्हटलं.  मित्रपक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत,असं ठरलं होतं. मात्र, घेतले गेलेले आहेत, त्याबाबत मुंबईत गेल्यावर चर्चा करु, असं अजित पवार म्हणाले. मूळ पक्षातील उमेदवार दुसऱ्या पक्षातून लोक घेतल्यावर नाराज होणार,  ते देखील संधी सोधतील, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढणार का?

महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो, काँग्रेस सोबत त्यावेळी हा अधिकार त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिला होता. आता देखील हा अधिकार त्या जिल्ह्यांना दिला होता. या निवडणुकीत कशा युत्या झाल्या ते जनतेनं पाहिलं आहे, निकाल लागलेला आहे. आम्ही महायुतीत काम करत असलो तरी भाजपला, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिक संधी द्यायची आहे, आम्हाला देखील आमच्या कार्यकर्त्यांना अधिक संधी द्यायची आहे. कार्यकर्त्याला देखील अधिक संधी मिळाली पाहिजे, त्यामुळं आम्ही एकमेकांविरोधात लढलो 29 महापालिकेत आमच महापौर व्हावा असं वाटतं.राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्यापद्धतीनं तिथले निर्णय जिल्हाध्यक्ष घेतील, असं अजित पवार म्हणाले.

मताची विभागणी झाल्यानंतर उमेदवार निवडून येण्यास अडचण येते. तिच मताची विभागणी नाही होऊन दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं.तिथले तिथले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील, असं अजित पवार म्हणाले.

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत आमच्या पक्षानं कमी जागा लढवल्या होत्या. आजच्या निकालावर आम्ही समाधानी आहे, कार्यकर्ता समाधानी आहे. पण, आम्हाला अजून काम करणं गरजेचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.