दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेत, दादा-ताईंचं बोलणं झालंय, सगळेजण घड्याळावर लढणार, अजितदादांच्या ब

अजित पवार आणि शरद पवार: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यादरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र येण्याबाबत चर्चा जोर धरत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीची चांगली पकड असून, येथे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या संदर्भात अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी मोठा दावा केला आहे.

Ajit Pawar & Sharad Pawar: तुतारी पण घड्याळावरच निवडणूक लढवणार

दत्तात्रय धनकवडे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, लवकरच जाहीर घोषणा होईल. दोन्ही पक्षातील नेत्यांचे बोलणं झाले आहे. ताई आणि दादांची याबाबत चर्चा झाली आहे. तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत. येत्या दोन दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र येण्यावर चर्चा झाली आहे. प्रशांत जगताप शहराचे अध्यक्ष असून, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आणि अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यातील चर्चा पूर्ण झाली असून तुतारी पण घड्याळावरच निवडणूक लढवणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar & Sharad Pawar: मविआसोबत युती करण्यासाठी शरद पवार गट अजित पवारांना प्रस्ताव देणार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पालिका निवडणुकीच्या संदर्भात सिल्व्हर ओक येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवावी, असा प्रस्ताव अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इतर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा ठाकरेंसोबत लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar & Satej Patil: पुण्यात अजित पवार मोठा डाव टाकणार? सतेज पाटलांना फोन फिरवला, म्हणाले….

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव

आणखी वाचा

Comments are closed.