अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शिवसेना ठाकरे गटाला ऑफर, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निवडणुकीसाठी शिवसेनामनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसह अजित पवारांसोबत देखील युती करण्याची ऑफर असल्याचे मत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं भविष्यात अजित पवारांचे राष्ट्रवादी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी सोबत लढलेली पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको असेही दानवे म्हणाले. महायुतीसोबत बैठकीमध्ये काही ठरले नाही तर सर्व पर्याय खुले असल्याचे मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे.

युतीबाबत ठरले नाही तर आमच्याकडे सर्व पर्याय खुले राहतील

महायुतीसोबत बैठकीमध्ये काही ठरले नाही तर सर्व पर्याय खुले असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. अंबादास दानवेंचा वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या  स्थानिक नेत्यांनी ही प्रतिक्रिया. दिली आहे. आमच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीसंदर्भात अधिकृत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. आमची महायुतीच्या घटकपक्षसोबत बैठक सुरू आहे. बैठकीत युतीबाबत ठरले नाहीच तर आमच्याकडे सर्व पर्याय खुले राहतील अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली आहे. महायुतीकडून आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर वरिष्ठांची निर्णय घेऊन आम्ही उद्धव ठाकरेंसोबत देखील जाऊ असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी सांगितलं आहे.

ठाकरे बंधुंच्या युतीची उद्या 12 वाजता घोषणा होणार

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे. शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या:

ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा; मुंबईतून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, शहाजी बापूंवरही कौतुकाचा वर्षाव

आणखी वाचा

Comments are closed.