मोठी बातमी : रोहित पवारांचा FIR का घेत नाही, सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे; राज ठाकरे रोखठोक

मुंबई: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास अनुकूलता दर्शवली नाही. त्यानंतर, रोहित पवारांनी (Rohit Pawar) आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. तसेच, या लढ्यात राज ठाकरे हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील, असा विश्वासही व्यक्त केला होता. त्यानंतर, आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांच्या भूमिकेवर परखडपणे भाष्य केलं. पोलीस रोहित पवारांचा FIR का घेत नाहीत, सरकारच संशयाची भूतं नाचवतंय, असे म्हणत सरकारला लक्ष्य केलं.

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूत फिरत आहेत. अपघात हा धुक्याने झाला की धोक्याने हे सुरू आहे, रोहित पवार यांनी सगळ्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या. पण त्यात एक बाब अशी की, त्यांनी तीन ठिकाणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण पोलीस तक्रार घेत नाही, गुन्हा दाखल करत नाहीत. इथेच संशय तयार होतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मरीन ड्राईव्हला एक अधिकारी FIR लिहित होते, मग डीसीपी आले आणि म्हणाले की तक्रार घ्यायची नाही, हे काय आहे? जर त्यांच्या कुटुंबातून कोणाला तरी तक्रार द्यायची आहे, मग सरकार का अडथळे आणत आहे? सुनेत्रा वहिनी ह्या आता सरकारमध्ये आहेत. राज्यात सांगितले जाते की कुठेही FIR नोंदवू शकता. पण FIR नोंदवायला गेलेला माणूस त्याची तक्रार घेतली जात नाही मग यातच काळ बेरं आहे का? असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

FIR का नोंदवून घेतला जात नाही

ब्लॅक बॉक्सचेही अजून काही कळले नाही, वितळून कितीही विस्कळीत झाले तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नाही. पण, सरकार संशयाची भूत नाचवत आहे. सरकार का FIR नोंदवू देत नाही, सगळ्या टेक्निकल गोष्टी बाजूला ठेवल्या पण FIR का नोंदवू घेतला जात का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आमदारांचा FIR पोलीस घेत नाहीत, मग सर्वसामान्यांचा काय?

सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्र्‍यांनी बोललं पाहिजे

हे राजकारण नाही आहे, राजकारण बाजूला ठेवूया पण FIR करू का देत नाही. सध्या अधिवेशन सुरू आहे, त्यात ही गोष्ट मांडावी. लोकसभेचेही अधिवेशन आहे, तिथेही राष्ट्रवादीच्या लोकांनी मुद्दे मांडावे. अजित पवार यांच्यासारख्या माणसाचा अपघात आहे, आणि त्यासाठी FIR करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत . अधिकाऱ्यांवर दबाव का आहे? एकच FIR आहे ना फक्त, त्यावर सरकार का घाबरत आहे. सुनेत्रा वहिनींनी यावर बोलले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तर बोलले पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी रोहित पवारांची भक्कमपणे बाजू घेतली.

हेही वाचा

रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले; कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.