Sangli Crime : म्युल अकाउंटमधून मोठी सायबर लूट, 34 डेबिट कार्ड, 27 सिमसह सांगलीत संशयित अटकेत
सांगली क्राईम न्यूज : सांगली जिल्ह्यातील 37 ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर (Cyber Crime News) पोलिसांनी जैब जावेद शेख (वय 22) याला अटक करत बेड्या ठोकल्या आहेत्यामुळे. पोलिसांनी या आरोपीकडून 34 डेबिट कार्ड, 27 मोबाईल सिम कार्ड, सहा मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहन, असा एकूण 11 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Sangli Crime News : 34 डेबिट कार्ड, 27 मोबाईल सिम कार्डसह 11 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, त्यात ‘म्युल अकाउंट’ हा नवा प्रकार समोर आला आहे. यामध्ये विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीसाठी भाड्याने घेऊन त्याबदल्यात खातेदारांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाते. या खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांत वर्ग केलें जातात, रोख स्वरूपात काढले जातात किंवा क्रिप्टो करंन्सीत रूपांतरित केले जातात. म्यूल अकाउंटचा वापर करून फसवणुकीचा नवा प्रकारच समोर आला आहे. यामध्ये सायबर चोरटे विविध व्यक्तींची बँक खाती भाड्याने घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम वर्ग करतात. जिल्ह्यात अशा प्रकारे बँक खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी शोधमोहीम राबवली.
Crime News : सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार
दरम्यान, पोलिसांच्या तपासात संशयित जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोघेतलास ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अशा पद्धतीने अजून कुणाची फसवणूक झालीय च्या, तसेत यात अजून मोठा मासे हाती खर्च च्या, याचा देखील पोलीस तपास करत आहे. तर नागरिकांनी अशा फसव्या व्यवहाराला बळी नाही पडता योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
Crime News : कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या बसवर दरोडा, 7 जणांच्या टोळीला 12 तासाच्या आत जेरबंद
कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या आराम बसवर दरोडा टाकणाऱ्या 7 जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 12 तासाच्या आत जेरबंद केलंय. काल रात्री 12 वाजता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर 7 चोरट्यांनी आराम बसच्या क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जवळपास 1 कोटी 22 लाखाचे चांदी आणि सोने आणि काही पार्ट्स चोरले होते. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलिसांनी टीम तयार केली आणि 12 तासाच्या आत दरोडा टाकणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. त्याच बरोबर चोरलेला 1 कोटी 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.