प्रशांत जगताप एवढ्या टोकाच्या भूमिका का घेतायेत? त्यांच्यासोबत डिबेटला तयार, नेमकं काय म्हणाल्य

सुप्रिया सुळे on प्रशांत जगताप पुणे: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास मी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिला आहे. काल त्यांनी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान, याबबत सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशांत जगताप यांचा प्रस्वात माझ्याकडे आला नाही. ते एवढ्या टोकाच्या भूमिका का घेत आहेत? हे मला कळत नसल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. प्रशांत जगताप यांना माझ्या सोबत बसवा मी डिबेट करायला तयार आहे असेही सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी सहा तास चर्चा केली. यामध्ये आम्ही निवडणुकीवर बोललो. सगळे निर्णय पवार साहेब घेतील. एकटे प्रशांत दादा बोलत आहेत बाकी कोणी बोलत नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. इथे बसलेल्या कुणालाही विचारा, आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब म्हणतील तसेच चालतो असे सुळे म्हगणाल्या.

प्रशांत जगताप यांची मन की बात काय कुठलीही बात ऐकायची माझी तयारी

प्रशांत जगताप यांची मन की बात काय कुठलीही बात ऐकायची माझी तयारी आहे. ते म्हणतील ते दिशा, ते म्हणतील ते उमेदवार द्यायला तयार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे येणाऱ्या महापालिकेत पुणे मुंबई आणि इतर महापालिकेत पक्षाच नेतृत्व करणार आहेत.  मी प्रशांत जगताप यांच्या बरोबर चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. त्यांची मागणी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. पवार साहेब केंद्र बिंदू म्हणून चालतो. जर पवार साहेब केंद्र बिंदू आहेत, तर त्यांनी जे ठरवतील आम्हाला मान्य असल्याचे सुळे म्हणाल्या.

आज पक्षाच्या बैठका झाल्या आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांच्या एक सुरात सूचना केली आहे. मनमोकळेपणे बोलावं यासाठी प्रक्रिया आहेत. प्रत्येकाने ठरवलं आहे शरद पवार ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या अस सांगितलं आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. पर्यावरण आणि वायू प्रदूषण या बद्दल सांगितलं आहे. अनेक वर्ष जे काम बोलत आले आहेत ते केल पाहिजे असे सुळे म्हणाल्या.

आणखी वाचा

Comments are closed.