काँग्रेस 50, ठाकरे गट 27, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा? सोलापुरातील महाविकास आघाडीच्य

सोलापूर निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) तारीख जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईठाण्यासह राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सोलापुरात (Solapur News) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि माकप यांच्यातील जागावाटपावर प्राथमिक एकमत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 50 ते 55 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 27 ते 29 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 17 ते 18 जागा तर माकपला 8 ते 10 जागा देण्यावर सहमती झाली आहे. मनसेसह काही जागांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती आहे.

Solapur Election 2026:  फॉर्म्यूला सर्व पक्ष आपल्या प्रदेश कार्यालयाला कळवणार

सोलापुरातील महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात काल संध्याकाळी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बहुतेक जागांवर एकमत झाले असले तरी 7 ते 8 जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र उर्वरित बहुतांश जागांचे वाटप निश्चित झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आज या ठरलेल्या फॉर्म्युल्याची माहिती संबंधित सर्व पक्ष आपल्या-आपल्या प्रदेश कार्यालयांना कळवणार आहेत. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम मंजुरी मिळाल्यावर सोलापुरातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतरित्या जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उर्वरित जागांवर अंतिम तोडगा काढण्यासाठी पुढील एक-दोन दिवसांत पुन्हा बैठक होण्याची शक्यता असून, सोलापुरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला प्रत्यक्षात कसा अंमलात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar: नगरपालिका निवडणुकीतील अपयशावर अजित पवारांची मंत्र्यांवर नाराजी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली असती, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला अधिक जागा मिळाल्या असत्या, असे ते म्हणाले. मंत्री बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि नरहरी झिरवळ यांच्याबाबत त्यांनी असमाधान व्यक्त केले. तसेच पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला तरीही गडचिरोली जिल्ह्यात अपेक्षित काम न झाल्याबद्दल माजी मंत्री बाबा अत्राम यांच्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा

Raj Uddhav Thackeray alliance: शिवसेना-मनसे युतीची घोषणा होताच राज ठाकरेंचा जुना मावळा रस्त्यावर उतरला, वसंत मोरेंनी कात्रज चौकात काय केलं?

आणखी वाचा

Comments are closed.