इकडे भाजपच्या केडरचा प्रवेशाला विरोध, तिकडे मातोश्रीने यतीन वाघ, विनायक पांडेंच्या हकालपट्टीचा

नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026: आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय फोडाफाडीला सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून गुरुवारी भाजपकडून (BJP) नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Mahanagarpalika Election 2026) ठाकरे गटाचे दोन बडे मोहरे गळाला लावले. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही विनायक पांडे (Vinayak Pande), यतीन वाघ, शाहू खैरे हे नेते पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात पोहोचले आहेत. परंतु, आज त्यांचा पक्षप्रवेश होणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. त्याचवेळी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक महत्त्वाचे ट्विट केले आहे. संजय राऊत यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.

पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांचे ठाकरेंकडे परत जाण्याचे दोर कापले गेले आहेत. नाशिकमध्ये आज प्रभाग 13 मध्ये होणाऱ्या भाजप प्रदेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांकडून विरोध दर्शवला जात आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी देखील प्रविशाला विरोध दर्शवला आहे. नाराज भाजप पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ज्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली अशा लोकांना पक्षाकडून लाल कार्पेट घातले जात असेल तर आम्ही निष्ठावंत म्हणून काम करत आहोत. पक्ष आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा आमचा पक्षावर विश्वास आहे.

नाशिक निवडणूक 2026: यतीन वाघ, विनायक पांडेना भाजप कार्यालयाबाहेरच थांबवलं

भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्या शाहू खैरे, विनायक पांडे यतीन वाघ गेल्या एक तासापासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. या तिघांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे. नव्यानं प्रवेश करणाऱ्या नेत्याना आणि त्यांच्या कार्येकर्त्याना अद्याप पक्ष कार्यालयात प्रवेश नाही. पोलिसांनी कार्यालयाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. एका बाजूला भाजप कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला नव्याने प्रवेश होणारे कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार नव्याने प्रवेश करणाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

गिरीश महाजन नाशिक : गिरीश महाजनांचं नाशिकमधलं ऑपरेशन कमळ उलटलं, भाजपचे कार्यकर्ते आयारामांवर संतापले

गेल्या काही महिन्यांपासून गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ठाकरे गटाला खिंडार पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच मोहीमेतंर्गत आज यतीन वाघ, विनायक पांडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार होता. परंतु, या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमून ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत आहेत. आपला महापौर करता येत नसल्याने बाहेरुन लोकांना आणले जात आहे. दुसऱ्या पक्षातील लोक नक्की घ्यावेत. पण त्यासाठी भाजपमधील मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. बाहेरुन आलेले लोक पाच-दहा वर्षांमध्ये मोठे होतात. मात्र, 50 वर्षांपासून पक्षात असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच राहतात, अशी खंत भाजपच्या एका स्थानिक महिला कार्यकर्त्याने बोलून दाखवली.

दरम्यान, शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्हाला भाजपमधील नाराजीविषयी काहीही माहिती नसल्याचे म्हटले. आम्ही भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहोत. त्यांनी आमच्या पक्षप्रवेशाला होकार दिला आहे. त्यांनी बोलावल्यामुळे आम्ही पक्षप्रवेशासाठी आलो आहोत. त्यामुळे भाजपमधील नाराजी ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते सगळे त्यांनी बघायचे आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि विकासाच्या प्रवाहात सामील होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी सांगितले.

आणखी वाचा

मोठी बातमी : ठाकरेंच्या युतीनंतर काल पेढे वाटणारे विनायक पांडे आज भाजपात, आमदार देवयानी फरांदेंचा कडाडून विरोध

आणखी वाचा

Comments are closed.