भाजपची पुण्यात 100 उमेदवारांची पहिली यादी तयार; धाकधूक वाढली, कोणाला संधी अन् कोणाला मिळणार डच्

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, अशातच पुण्यात भाजपची (BJP Pune) १६५ उमेदवारांपैकी १०० उमेदवारांची पहिली यादी (First list of candidates) तयार झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. २६ डिसेंबरला ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. बाकी जागांवरचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे. आज ही यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे. पुण्यात भाजपमधील (First list of candidates) नेते आणि आमदारांचे नातेवाईक अनेक प्रभागातून इच्छुक आहेत. मुरलीधर मोहोळ कुटुंबाकडून दुष्यंत मोहोळ, माधुरी मिसाळ कुटुंबाकडून करण मिसाळ, गिरीश बापटांची सून स्वरदा बापट हे इच्छुक आहेत. युतीमध्ये शिंदेंना ३४ जागा द्याव्यात अशी मागणी केली पण एवढ्या जागा मिळणार नसल्याचं भाजपने स्पष्ट सांगितल आहे. त्यामुळे पुण्यात भाजप- शिवसेना युतीतील समस्या दूर होताना दिसत नाहीयेत. (First list of candidates)

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार झाली आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक नावांवर एकमत झाले. तर ४० ते ५० नावांवर कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत झाले नाही. त्यामुळे ही नावे प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे देऊन त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीने मान्यता दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी उद्या शुक्रवारी (२६ डिसेंबरला) ही यादी जाहीर केली जाणार आहे.(First list of candidates)

महापालिकेची निवडणूक जाहीर होताच भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्ष यांनी एकत्रित ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे) पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ३४ जागा शिवसेना (शिंदे) पक्षाला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. मात्र इतक्या जागा दिल्या जाणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

महापालिकेत एकहाती सत्ता कशी मिळेल, यासाठी भाजपने चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. महापालिकेसाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक एका हॉटेलमध्ये झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Politics: पुण्यातील युती-आघाडी सध्यस्थिती

पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला अजुन पक्का झाला नाही आहे. जागावाटपाचा तिढा युती झालेल्या दिवसापासून कायम आहे. ४१ प्रभागात एकूण १६५ जागा आहेत. भाजप १२५ जागा जिंकण्यावर दावा करत आहेत आणि ४० जागेचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपसमोर ठेवला आहे. जागावाटपावरून शिवसेनेत देखील नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या युतीचा नेमका फॉर्म्युला काय ठरतो हे पाहव लागणार आहे. उद्या भाजपची अंतिम यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्त करण्याची शक्यता आहे. मात्र त्या आधी भाजपसमोर शिवसेनेची नाराजी दूर करणे आणि त्या योग्य जागा देणे जे आव्हान असणार आहे. पुण्यात मनसे आणि ठाकरे गट एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे. तशा बैठकादेखील होत आहे. सोबतच काँग्रेसदेखील त्यांना साथ देण्याच्या तयारीत आहे.

शरद पवार आणि अजित पवार महापालिका निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवारांनी ३ दिवस मॅरेथॉन बैठक आणि मुलाखती घेतल्या आणि त्यांची यादी तयार केली त्यानंतर त्यांनी शरद पवार गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं बोलल जात आहे. सोबतच आज दिवसभर पुणे महापालकेसाठी शरद पवार गटाकडून स्वतः सुप्रिया सुळे एक्शन मोडवर आल्याच दिसून आल. त्यांनी महापालिकेत लक्ष घालून दिवसभर उमेदवारांची चाचपणी केली. शरद पवारगटाचे आणि पवार कुटुंबीयांच्या सगळ्यात जवळचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सुप्रिया सुळेंना निवडणुकीत लक्ष घालाव लागत असल्याच्या चर्चा आहे.

अजित पवार यांनी काँग्रेसला सोबत घायची इच्छा दाखवली आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केला. पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीदेखील प्रस्ताव आल्यास स्वागत करू अस सांगितल मात्र आता अजित पवार यांच्या सोबत युतीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे युतीला तयार आहेत तर ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी या युतीला विरोध केला आहे आणि तस पात्र हाय कमांडकडे पाठवल आहे. काँग्रेस अजित पवार शरद पवारांशी युती करतात का आणि केलं तर जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल हे पाहव लागणार आहे

आणखी वाचा

Comments are closed.