मनसेची साथ सोडलेले प्रकाश महाजनांचं अखेर ठरलं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

प्रकाश महाजन होणार शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ सोडल्यानंतर प्रकाश महाजन नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे. प्रकाश महाजन हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या दुपारी साडेबारा वाजता ठाण्यात प्रकाश महाजन हे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.

मनसे पक्षाची साथ सोडलेल्या प्रकाश महाजन यांनी अखेर नवीन वाटचाललीसाठी राजकीय निर्णय घेतला आहे. ते उद्या शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी साडेबारावाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. मनसे पक्षातून राजीनामा दिल्यानंतर आज प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे.

13 सप्टेंबर रोजी रोजी प्रकाश महाजन यांनी मनसेचा दिला होता राजीनामा

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. अखेर 13 सप्टेंबरला अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचे मानले जात होता. त्यानंतर पुढे प्रकाश महाजन काय निर्णय घेणार की पक्षाकडून त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण अखेर त्यांनी तीन महिन्यांनी नवीन निर्णय घेतला आहे. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

मी राज ठाकरेंना घाबरत नाही

माझा थोडं वय वाढलं आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही असे त्यांनी म्हटले. नारायण राणेंना आव्हान देणे तुम्हाला भावलं का? असे विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले की, नाही तसे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काहीही नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवलं नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या:

Prakash Mahajan On Raj Thackeray: मी राज ठाकरेंना घाबरत नाही; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याआधी प्रकाश महाजनांचं विधान, वैभव खेडेकरही सोबत

आणखी वाचा

Comments are closed.